महाराष्ट्राची मुनमून तायडे राष्ट्रीय रायफल स्पर्धेत खेळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 13:46 IST2019-12-22T13:45:48+5:302019-12-22T13:46:45+5:30
ऑगस्टमध्ये इंदूर येथे झालेल्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करून राष्ट्रीय तिची स्पर्धेकरिता नियुक्ती झाली होती.

महाराष्ट्राची मुनमून तायडे राष्ट्रीय रायफल स्पर्धेत खेळणार
अमरावती : मध्यप्रदेशातील भोपाळ येथे १८ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरी रायफल स्पर्धेत अमरावतीच्या मुनमून तायडे हिने आगाऊ गुण मिळविल्याने केरळमधील तिरुअनंतपूरम येथे जानेवारी २०२० मध्य होऊ घातलेल्या इंडिया ट्रायल्सकरिता तिची निवड झाली आहे. भविष्यात रायफल शूटिंग प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा तिचा मानस आहे.
येथील भंवरीलाल सामरा शाळेची इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी मुनमून तायडे हिने जून २०१९ मध्ये मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत युथ गटातून राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. त्यानंतर ऑगस्टमध्ये इंदूर येथे झालेल्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करून राष्ट्रीय तिची स्पर्धेकरिता नियुक्ती झाली होती. ऑक्टोमध्ये अमरावती येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक प्राप्त केले असून, जानेवारी २०२० मध्ये केरळमधील तिरुअनंतपुरम येथे होऊ घातलेल्या इंडिया ट्रायल्सकरिता तिची निवड झालेली आहे. याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.