शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 5:52 AM

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रोहा-रायगड येथे २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रोहा-रायगड येथे २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्टÑाचा संघ जाहीर झाला असून गिरिश एर्नाक याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.गतवर्षी आपल्या भक्कम बचावाच्या खेळामुळे महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ठाण्याच्या गिरीशच्या गळ्यात संघाच्या नेतृत्वाची माळ पडली. कोल्हापूरच्या तुषार पाटीलला उप कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. या संघात रायगड, पुणे, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्याच्या दोन-दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे. तर मुंबई, उपनगर, सांगली, कोल्हापूर यांचा एक खेळाडू या संघात आहे.सिद्धार्थ देसाईला मात्र महाराष्ट्राच्या संघाबाहेर बसावे लागले. सिद्धार्थ रेल्वेमध्ये नोकरी करत आहे. त्याने आंतर रेल्वे कबड्डी स्पर्धेत दक्षिण-मध्य रेल्वेला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याचा समावेश अलिबाग येथे झालेल्या महाराष्ट्र संघाच्या शिबिरात करण्यात आला होता. महाराष्ट्र संघाकडून खेळण्यासाठी सिद्धार्थने रेल्वेचा राजीनामा दिला, पण रेल्वेने तो स्वीकारला नाही. त्याला रेल्वेकडूनही ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने तो महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.>महाराष्ट्राचा संघगिरीश एरनाक - कर्णधार (ठाणे), तुषार पाटील - उपकर्णधार (कोल्हापूर), विशाल माने (मुं. शहर), रिशांक देवाडीगा (मुं. उपनगर), विकास काळे (पुणे), अमीर धुमाळ (रायगड), निलेश साळुंखे (ठाणे), सचिन शिंगाडे (सांगली), अभिषेक भोजने (रत्नागिरी), सुनील दुबिले (पुणे), अजिंक्य पवार (रत्नागिरी), संकेत बनकर (रायगड). प्रशिक्षक : प्रताप शिंदे (मुं. उपनगर), व्यवस्थापक : मनोज पाटील (ठाणे).

टॅग्स :Kabaddiकबड्डी