महाराष्ट्र राज्य केसरी स्पर्धा जिल्हा चाचणी १३ पासून
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:03+5:302014-12-02T00:36:03+5:30
नाशिक - महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या वतीने आयोजित ५८वी राज्यस्तरीय वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा १३ डिसेंबरला होणार असल्याची माहिती परिषदेचे गोरख बलकवडे यांनी दिली़

महाराष्ट्र राज्य केसरी स्पर्धा जिल्हा चाचणी १३ पासून
न शिक - महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या वतीने आयोजित ५८वी राज्यस्तरीय वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा १३ डिसेंबरला होणार असल्याची माहिती परिषदेचे गोरख बलकवडे यांनी दिली़ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २४ डिसेंबरला अहमदनगर येथील वाडिया पार्क मैदानावर होणार आहेत़ यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ाचा संघ निवडण्यात येणार आहे़ ही निवड चाचणी भरवीर खुर्द ता़ इगतपुरी येथे १३ व १४ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे़ यामध्ये ५७ किलो, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७ तसेच महाराष्ट्र केसरी साठी ८६ ते १२५ किलो गटांची चाचणी होणार आहे़ तत्पूर्वी तालुकानिहाय चाचणी स्पर्धा होणार असून, यातील विजयी झालेल्या मल्लांची जिल्हास्तरीय निवड चाचणी होणार आहे़ यामधून नाशिकचा संघ निवडला जाणार आहे़