शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा असा तयार केला आखाडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 22:07 IST

या मातीत १ हजार लिंबू, २५० किलो हळद, ५० किलो कापूर, रोज १०० लीटर ताक व ६० लीटर तेल घालून मातीचे आखडे तयार झालेत.

ठळक मुद्देअभिजित कटकेवर लक्ष

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित ६३व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण असणार, याबाबत राज्यभरातील कुस्तीच्या चाहत्यांसह तमाम क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. पण या स्पर्धेचा आखाडा कसा बनवला, याबाबतची लोकांमध्ये उत्सुकता आहे. 

मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची ४० ब्रास माती आणून २०-२० ब्रासचे दोन आखडे बनविण्यात आले. या मातीत १ हजार लिंबू, २५० किलो हळद, ५० किलो कापूर, रोज १०० लीटर ताक व ६० लीटर तेल घालून मातीचे आखडे तयार झालेत. मल्लांना स्पर्शांतून, जखमांतून कोणत्याही प्रकारचे आजार किंवा लागण न होण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते. ४० बाय ४० चे रिंगण व ३० बाय ३० चा प्रत्यक्ष खेळाचा भाग अशा प्रकारे हे चार आखडे बनविण्यात आलेत. आखाड्यांचा मुख्य मंच ६० बाय २१० फुटांचा असून त्या बाहेर १० फुटाचा भाग पंचांसाठी व त्या बाहेर १० फूट भाग मल्लांच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

७ जानेवारीपर्यंत रंगणाºया या स्पर्धेसाठीची तयार पूर्ण झाली असून मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत माती आणि गादीवरील (मॅट) प्रत्येकी १० अशा एकूण २० वजन गटांमध्ये लढती होतील. स्पर्धेत ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरी गट असे दहा वजनी गट आहेत. राज्याच्या विविध भागांतील सुमारे ९५० मल्ल आणि १२५ पंच या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

अभिजित कटकेवर लक्षपुण्याचा अभिजित कटकेवर कुस्तीप्रेमींचे विशेष लक्ष असेल. तो दुसºयांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविण्याच्या इराद्याने लढेल. २०१७ मध्ये महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर २०१८ मध्ये मात्र त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत बुलडाण्याचा बाला रफिक शेखने त्याला धक्का दिला होता.  बाला रफिक आणि २०१७ चा उपविजेता किरण भगत दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत अभिजितच्या दुसºया किताबाची उत्सुकता आहे. 

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्तीMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे