शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मल्लविद्येचा शिरपेच ‘महाराष्ट्र केसरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:49 IST

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.मल्लविद्येतील आपल्या अखंड तपश्चर्येने १९६४ व ६५ मध्ये गणपतराव खेडकर, १९६७ व ६८ मध्ये चंबा मुत्नाळ, १९६९-७० मध्ये दादू चौगुले, १९७२-७३ मध्ये लक्ष्मण वडार, तर २००७-०८ मध्ये चंद्रहार पाटील यांनी डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळवून देदीप्यमान कामगिरी केली. ‘वीरपुरुष जन्माला येतात ते इतिहास निर्माण करण्यासाठी’ या उक्तीप्रमाणे आणि आपल्या नावातच पराक्रमी पुरुषाचा अर्थ सामावलेल्या मुंबईच्या नरसिंग यादवने महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्ट्रिक करीत ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केली. परंतु पराक्रमी पुरुषांची जननी असलेल्या या महाराष्ट्राच्या रणमैदानात जणू काही अद्वितीय कामगिरी करून इतिहास निर्माण करण्याची चढाओढच लागली होती. २०१४ ते २०१६ या कालावधीत जळगावच्या विजय चौधरीने नरसिंगच्या पराक्रमाची बरोबरी करीत महाराष्ट्र केसरीची हॅट्ट्रिक मिळवून दिग्विजयाचा डंका वाजविला.१९६१ पासून १९८७ पर्यंत महाराष्ट्र केसरी किताबाची लढत ही लाल मातीच्या आखाड्यामध्ये होत होती. परंतु कुस्तीची जननी लाल माती तिला न विसरता आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्रातील मल्लांची कामगिरी उंचावली पाहिजे ही विचारधारणा मनात ठेवून कुस्तीमहर्षी बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत मॅटवर खेळविण्याची संकल्पना कार्यकारिणीमध्ये मांडून १९८८ पासून अंतिम लढतीसाठी मॅटवर प्रारंभ झाला. चापल्य आणि वेग यांचा सुरेख संगम साधत सोलापूर जिल्ह्यातील निमगावच्या रावसाहेब मगरने मॅटवरील अंतिम फेरीची लढत जिंकून महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी गावच्या पिता व पुत्र हिरामण बनकर आणि विजय बनकर त्याचप्रमाणे कोल्हापूरचे दादू चौगुले व विनोद चौगुले यांनी मिळवलेले महाराष्ट्र केसरीचे किताब कुस्तीक्षेत्रातील पराक्रमाचे अलौकिक ऐतिहासिक पान म्हणून लिहावे लागेल. अशा अद्वितीय, अविस्मरणीय पराक्रम लाभलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाची पुढील गाथा लिहिण्यासाठी मुळशी तालुक्यातील भूगाव सज्ज झाले आहे.-दिनेश गुंड(आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच)