शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा 'पैलवान' जिंकला, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेला 'सिल्व्हर मेडल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 22:56 IST

23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रविंदरची चमक, सत्यव्रत कडीयानला सुवर्णपदक तर, प्रविण राणा रौप्यपदकावर समाधानी

जालंधर, नोव्हेंबर 29 : सिनियर कुस्ती राष्ट्रीय स्पर्धेत सुमित आणि सत्यव्रत कडीयान यांनी सुवर्णपदक मिळवत दक्षिण आशियाई गेम्ससाठी आपली जागा निश्चित केली आहे.जालंधर येथे तब्बल 14 वर्षांनंतर स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सुमितने महाराष्ट्रच्या अभिजितवर 5-0 असा विजय मिळवत चमक दाखवली. रेल्वेच्या या खेळाडूला 125 किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कडीयानने उत्तरप्रदेशच्या कपिल चौधरीवर 97 किलो वजनीगटात 9-0 असा एकतर्फी विजय नोंदवला.74 किलो वजनी गटात रेल्वेच्या प्रविण राणासमोर युवा कुस्तीगीर उत्तरप्रदेशच्या गौरव बलियानचे आव्हान होते. पण, अनुभवी राणाला अंतिम सामन्यात 3-5 असे पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

आपला फॉर्म कायम ठेवत 23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रविंदरने सर्व्हिसेसाठी एसएससीबीच्या सोनाबा तानाजीला 12-2 असे 61 किलो वजनी गटात नमविले. या विजयमूळे रविंदरचे दक्षिण आशियाई गेम्समधील स्थान निश्चित झाले आहे. 70 किलो वजनीगटातील उपांत्यफेरीचा सामना लक्षवेधी राहिला. झारखंडच्या नवीनने नाकाला दुखापत होऊन देखील सर्व्हिसेसच्या नवीनवर विजय मिळवला.यानंतर अंतिम सामन्यात त्याने हरयाणाच्या विशालला नमविले.स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आघाडीच्या महिला रेसलर सहभागी होणार आहेत. भारताच्या विणेश फोगाट (55 किलो), रिओ कांस्यपदक विजेती साक्षी मलिक (62 किलो), दिव्या काकरान (68 किलो), सीमा बिसला (50 किलो), सरिता मोरे (57 किलो) आणि नवजोत कौर (65 किलो) यांचा सहभाग असेल.   सात गटातील  सुवर्णपदक विजेते रेसलर  (पुरुष फ्रीस्टाईल 57 किलो, 61 किलो, 65 किलो, 74 किलो, 86 किलो, 97 किलो, 125 किलो, महिला -50 किलो, 53 किलो, 57 किलो, 59 किलो, 62 किलो, 68 किलो, 76 किलो) या सर्वांनी 6 ते 9 डिसेंबर मध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई गेम्ससाठी पात्रता मिळवली आहे.

टॅग्स :Abhijeet Katkeअभिजीत कटकेMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा