शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 10:22 IST

सोमवारी हरियाणा येथे आशिआई अजिंक्यपद स्पर्धेसाठीची निवड चाचणी घेण्यात आली.

जागतिक कुस्ती स्पर्धेत विक्रमी कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सोमवारी हरियाणा येथे आशिआई अजिंक्यपद स्पर्धेसाठीची निवड चाचणी घेण्यात आली. त्यात राहुलनं 61 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. दिल्ली येथे 18 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.  राहुलने पहिल्या सामन्यात दिल्लीच्या नवीन कुमारला पराभूत केले, तर अंतिम कुस्तीत हरियाणाच्या रविंद्रला 7-5 असे नमवून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक व जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने राहुलला प्रथम वर्ग दर्जा अधिकारी पदी नियुक्त करत पोलिस उपअधीक्षक पदी थेट बढती दिली. 

राहुलने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याने 61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला. राहुलने 2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. 'लोकमत'ने  त्याला  'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले होते. 

अन्य गटातील खेळाडू

  • फ्री स्टाईल  - राहुल आवारे ( 61 किलो), नवीन ( 70 किलो), गौरव बलियान ( 79 किलो), सोमवीर ( 92 किलो)
  • ग्रीको रोमन - अर्जुन ( 55 किलो), सचिन राणा ( 63 किलो), आदित्य कुंडू ( 72 किलो), हरप्रीत सिंग ( 82 किलो) 
  • महिला गट - पिंकी ( 55 किलो), सरिता ( 59 किलो), साक्षी मलिक ( 65 किलो), गुरशरणप्रीत कौर ( 72 किलो) 
टॅग्स :Rahul Awareराहुल आवारेWrestlingकुस्ती