अल्प पावसामुळे रब्बी हंगामावर परिणाम कककक आणेवारीकडे नजरा : सोयाबीनचा उतारा निम्म्यावऱ़़
By Admin | Updated: September 30, 2014 21:39 IST2014-09-30T21:39:04+5:302014-09-30T21:39:04+5:30
शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर आर्थिक गणिते आहेत़ परंतु, रोगांच्या प्रादुर्भावाने आणि पावसाने दगा दिल्याने सोयाबीन होरपळत असून उतारा निम्याने घटला आहे़ परिणामी, खरीप हंगामात झालेला खर्च कसा काढायचा आणि रबी हंगामाची पेरणी कशी करायची असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्यांसमोर उभा आहे़ त्यामुळे शेतकर्यांच्या नजरा आता आणेवारीकडे लागल्या आहेत़ आणेवारी योग्य पद्धतीने घ्यावी़ त्यामुळे शेतकर्यांना विम्याचा तरी लाभ मिळेल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे़

अल्प पावसामुळे रब्बी हंगामावर परिणाम कककक आणेवारीकडे नजरा : सोयाबीनचा उतारा निम्म्यावऱ़़
श रूर अनंतपाळ : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर आर्थिक गणिते आहेत़ परंतु, रोगांच्या प्रादुर्भावाने आणि पावसाने दगा दिल्याने सोयाबीन होरपळत असून उतारा निम्याने घटला आहे़ परिणामी, खरीप हंगामात झालेला खर्च कसा काढायचा आणि रबी हंगामाची पेरणी कशी करायची असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्यांसमोर उभा आहे़ त्यामुळे शेतकर्यांच्या नजरा आता आणेवारीकडे लागल्या आहेत़ आणेवारी योग्य पद्धतीने घ्यावी़ त्यामुळे शेतकर्यांना विम्याचा तरी लाभ मिळेल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे़ शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकूण २८ हजार ५०० हेक्टर्स लावगडीयोग्य जमीन असून, त्यापैकी १७ हजार ६५६ हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ त्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकर्यांनी सोयाबीनच्या राशीवर अनेक संसारिक गणिते घातली होती़ परंतु, सुरुवातीला पावसाने आणि आता रोगाने सोयाबीन पुर्णता: करपले आहे़ त्यात पावसाने पुन्हा दडी मारली आहे़ दसरा, दिवाळीचा सण तोंडावर आल्याने अनेकजण राशीसुद्धा करीत आहेत़ राशी करणार्या शेतकर्यांच्या पदरी घोर निराशाच पडत आहे़ कारण काळ्या कसदार जमिनीतील सोयाबीनसुद्धा एकरी चार पोतेच निघत आहे़ माळरान जमिनीतील सोयाबीच्या राशी करण्याचासुद्धा खर्च निघत नाही़ लागवड खर्च तर दुरच राहिला़पावसाने मोठा ताण दिल्याने ऐन बहरात सोयाबीनची वाढ खुंटली़ त्यातच रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला़ परिणामी सोयाबीन, ज्वारीच्या आकाराचे बनल्याने उतारा निम्याने घटला आहे़ त्याचबरोबर सोयाबीन आहे की ज्वारी आहे हेच प्रथमदर्शनी समजत नाही़ सोयाबीन काढण्यासाठी शेतकर्यांची एकच धावपळ सुरु झाली आहे़ परंतु, सध्या निवडणुका सुरु असल्याने मजूर कार्यकर्ते झाले आहेत़ त्यामुळे शेतकरी चोहीकडून त्रस्त झाले आहेत़