शिलाई काम करून आईनं शैलीला बनवलं चॅम्पियन; झासीतील १७ वर्षीय खेळाडूनं जागतिक स्पर्धेत रचला इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 11:38 AM2021-08-23T11:38:48+5:302021-08-23T11:52:25+5:30

भारताच्या १७ वर्षीय शैली सिंगनं नैरोबी येथे सुरू असलेल्या २० वर्षीय जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. तिनं ६.५९ मीटर लांब उडी मारून दुसरे स्थान पटकावले,

Long jumper Shaili Singh win silver in U 20 World Championship; daughter of single mother, know about her | शिलाई काम करून आईनं शैलीला बनवलं चॅम्पियन; झासीतील १७ वर्षीय खेळाडूनं जागतिक स्पर्धेत रचला इतिहास!

शिलाई काम करून आईनं शैलीला बनवलं चॅम्पियन; झासीतील १७ वर्षीय खेळाडूनं जागतिक स्पर्धेत रचला इतिहास!

Next

भारताच्या १७ वर्षीय शैली सिंगनं नैरोबी येथे सुरू असलेल्या २० वर्षीय जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. तिनं ६.५९ मीटर लांब उडी मारून दुसरे स्थान पटकावले, १ सेंटीमीटरच्या फरकानं तिला सुवर्णपदकानं हुलकावणी दिली. या स्पर्धेतील लांब उडी प्रकारातील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ठरले. याआधी अमित खत्रीनं १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले, तर ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघानं कांस्यपदक जिंकले. 

कोण आहे टीम डेव्हिड?; RCBचा नवा भीडू ICC ट्वेंटी-२० रँकिंगमध्ये वॉर्नर, रिषभ, स्मिथ यांच्याही पुढे!

शैली भारताची दिग्गज अॅथलेटिक अंजू बेबी जॉर्जच्या बंगळुरू येथील अकादमीत सराव करते. या स्पर्धेत एक वेळ अशी होती जेव्हा शैली सुवर्णपदकाच्या शर्यतीत सर्वांत पुढे होती. पण ज्युनियर युरोपियन चॅम्पियन असलेल्या माजाने चौथ्या प्रयत्नात ६.६० इतकी लांब उडी मारत सुवर्णपदक पटकावले. तिनं फायनलमध्ये तिसऱ्या प्रयत्नात ६.५९ मीटर उडी मारली. पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात तिला ६.३४ मीटर लांब उडी मारता आली होती. चौथ्या व पाचव्या प्रयत्नात तिच्याकडून फाऊल झाला आणि सहाव्या प्रयत्नात तिनं ६.३७ मीटर लांब उडी मारली. स्वीडनच्या माजा अस्कागननं ६.६० मीटर लांब उडी मारून सुवर्णपदकावर कब्जा केला.  


शैली १४ वर्षांची होती तेव्हा ज्यूनियर राष्ट्रीय स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज हिचे पती रॉबर्ट बॉबी जॉर्ज यांचे तिच्यावर लक्ष गेले. रॉबर्ट यांनी स्वतः अंजूला प्रशिक्षण दिले होते. त्यांनी शैलीतील प्रतिभा ओळखली व बंगळुरू येथील अकादमीत तिला सरावासाठी बोलावलं. शैलीची आई यासाठी तयार नव्हती, परंतु रॉबर्ट यांनी तुमची मुलगी आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू बनू शकते असा विश्वास त्यांना दिला.  


शैलीच्या यशात तिच्या आईचा फार मोठा वाटा आहे. लहानपणापासूनच आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी हार मानली नाही. उत्तर प्रदेशच्या झांसी येथील शैलीची आई शिलाई काम करते आणि त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. संकटावर मात करून शैलीनं इथपर्यंतचा प्रवास केला आहे. शैलीनं ज्युनियर स्तरावरील राष्ट्रीय विक्रम तोडला आहे. १८ वर्षांखालील क्रमवारीत ती अव्वल स्थानावर आहे.   

Web Title: Long jumper Shaili Singh win silver in U 20 World Championship; daughter of single mother, know about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.