शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

Messi Maradona: मानलं भावा... लिओनल मेस्सीने केली कमाल, मोडला दिग्गज मॅराडोनाचा विक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 10:00 AM

Lionel Messi Diego Maradona, Argentina: अर्जेंटिनाने विजयासह बाद फेरीत मारली धडक

Lionel Messi Diego Maradona, Argentina: FIFA World Cup 2022 च्या C गटाच्या सामन्यात अर्जेंटिनाने पोलंडचा पराभव केला. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने हा सामना २-० असा जिंकला. या सामन्यात मेस्सीने दिग्गज फुटबॉलपटू मॅराडोनाचा विक्रम मोडला. त्याच वेळी पोलंडलाही अर्जेंटिनाकडून पराभवाचा फायदा झाला. मॅराडोनाचा विक्रम मोडण्यासाठी मेस्सीला काहीही विशेष करण्याची गरज नव्हती. मैदानात उतरताच त्याने मॅराडोनाला मागे सोडले. कारण अर्जेंटिनासाठी फिफा विश्वचषकात सर्वाधिक २२ सामने खेळणारा मेस्सी पहिला खेळाडू ठरला. मॅराडोनाने वर्ल्ड कपमध्ये २१ सामन्यात अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले होते.

कतारच्या मैदानात दोन्ही संघांमध्ये आक्रमक फुटबॉल पाहायला मिळाला. अर्जेंटिनाने सुरुवातीपासूनच पोलंडच्या गोलपोस्टवर आक्रमणे सुरूच ठेवली. पूर्वार्धात त्यांनी किमान ६ वेळा आक्रमण केले पण पोलंडच्या बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. सामन्याच्या ३८व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टीही मिळाली. पण मेस्सीला त्याचं सोनं करता आलं नाही. त्याची किक पोलंडच्या डायव्हिंग गोलकीपरने वाचवली. पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत राहिला.

मात्र दुसरा हाफ सुरू होताच अर्जेंटिनाने पोलंडविरूद्ध पहिला गोल केला. सामन्याच्या ४६व्या मिनिटाला अॅलेक्सिस अॅलिस्टरने अर्जेंटिनासाठी गोल केला. सामन्यात ०-१ ने पिछाडीवर असलेल्या पोलंडनेही गोलशून्य बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रयत्नात त्याने आणखी एक गोल दिला. सामन्याच्या ६७व्या मिनिटाला अल्वारेझने गोल करत अर्जेंटिनाला सामन्यात २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मात्र सामन्यात एकही गोल होऊ शकला नाही. अर्जेंटिनाने सामना जिंकला. आता अर्जेंटिनाची बाद फेरीत ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Lionel Messiलिओनेल मेस्सीArgentinaअर्जेंटिनाQatarकतार