शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेच्या लढतीची साऱ्यांनाच उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 4:53 PM

पुणे शहराच्या निखिल कदमने  साताऱ्याच्या सागर सुळचा ७-० अशा गुणफरकाने पराभव करून अंतिम फेरीत गाठली

जालना : आज सकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटाचे ड्रॉही पाडण्यात आले असून,  गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि गेल्या वर्षी दुखापतीमुळे पहिल्याच फेरीतून बाहेर पडलेला शिवराज राक्षे यांच्यात लढत होणार आहे. विक्रम वडतिले विरूद्ध विष्णु खोसे, गुलाबराव आगरकर विरुद्ध महेश वरुटे, मुन्ना झुंजुरके विरुद्ध समाधान पाटील अशा काही चटकादार कुस्त्या आज संध्याकाळ च्या क्षेत्रात पाहायला मिळणार आहेत.

Video : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत फेव्हरेट कोण, जाणून घ्या...

६१ किलो माती विभागात सेमी फायनलमध्ये  पुणे शहराच्या निखिल कदमने  साताऱ्याच्या सागर सुळचा ७-० अशा गुणफरकाने पराभव करून अंतिम फेरीत गाठली, तत्पूर्वी निखिलने उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेला ४-२ असे नमवून सेमीफायनल गाठली होती.  दुसऱ्या सेमी फायनलमध्ये सांगलीच्या राहुल पाटील आणि उस्मानाबादच्या दत्ता मेटे यांच्यात झालेल्या अत्यंत अटीअटीची लढतीत राहुल पाटीलने दत्ता मेटेवर १२-११ असा निसटसा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या (कांस्यपदक) लढतीत साताऱ्याच्या सागर सूळने उस्मानाबादच्या दत्ता मेटेवर ५-४ अशी मात करत कांस्यपदकाची कमाई केली.

६१ किलो वजनी गटात गादी विभागाच्या सेमी फायनल मध्ये कल्याणच्या जयेश साळवीने नाशिकच्या सागर बर्डेचा १०-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने जालन्याच्या अक्षय धानोरेवर ४-२ अशी मात करून अंतिम फेरी गाठली आहे. 

तिसऱ्या (कांस्यपदक) क्रमांकासाठी झालेल्या नाशिकच्या सागर बर्डेने औरंगाबादच्या नुमेश पिंपळेचा ८-२ अशा गुण फरकाने पराभव करून कांस्यपदक पटकाविले, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विजय पाटीलनेही जालन्याच्या अक्षय धानोरेवर १०-० अशी मात करत कांस्यपदक जिंकले. 

७० किलो गादी विभागातल्या उपांत्य लढतीत कोल्हापुरच्या स्वप्निल पाटीलने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीला ४-३ ने हरवत अंतिम फेरीत धडक मारली. पुण्याच्या शुभम थोरातने सोलापुरच्या धिरज वाघमोडेला ८-२ अशा गुणाधिक्क्याने पराभव करून अंतिमफेरी गाठली. या गटातील कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीने लातूरच्या आकाश देशमुखचा ७-२ अशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक पटकाविले. तर सोलापूरच्या धीरज वाघमोडेनेही साताऱ्याच्या आकाश मानेवर ८-५ अशी मात करून कांस्यपदक जिंकले.  ७० किलो गादी विभागाच्या सेमी फायनलमध्ये पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोपडेने लातूरच्या चंद्रशेखर पाटीलवर २-० अशी मात करून अंतिम फेरीत धडक मारली, तर दुसऱ्या सेमी फायनलच्या लढतीत अहमदनगरच्या अक्षय कावरेने कोल्हापूरच्या इंद्रजित मगदुमचा १२-१ अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर माती विभागातून अरुण खेगळे हा कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्ती