शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियात सातत्याचा अभाव : व्यंकटराघवन

By admin | Updated: February 6, 2015 02:10 IST

विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे

चेन्नई : विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. याशिवाय, सलामीच्या जोडीचा प्रश्न सुटलेला नाही, असे मत माजी भारतीय कर्णधार श्रीनिवास व्यंकटराघवन यांनी नोंदविले. १९७५ आणि १९७९च्या विश्वषकात भारतीय संघाचे कर्णधार राहिलेले व्यंकटराघवन म्हणाले, ‘‘सध्याच्या संघात सातत्याचा अभाव आहे. आघाडीची आणि मधल्या फळीतील फलंदाजी, गोलंदाजीदेखील कमकुवत आहे. सातत्यपूर्ण कामगिरी ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते आणि भारतीय संघात नेमकी हीच बाब आढळत नाही. आघाडीच्या क्रमावर आमच्याकडे स्थिर संयोजन नाही. वन डे क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात करायची झाल्यास संयोजन मोलाचे ठरते.’’ त्यांनी धोनीच्या फलंदाजीचे आणि सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले. कर्णधार हा प्रेरणादायी आणि अनुभवी असल्याचे सांगितले; पण गोलंदाजीची त्याला साथ लाभत नाही, याविषयी चिंता वर्तवली. गोलंदाजी चिंतेचा विषय असून आमचे आघाडीचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांपुढे टिकत नाहीत. शिवाय, क्षेत्ररक्षणही कुचकामी असते, असे सांगून त्यांनी १९८३च्या विश्वषकाच्या अंतिम सामन्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘कपिलच्या मिडविकेटवरील एका उत्कृष्ट झेलामुळे सामन्याचे चित्र पालटले. चांगले क्षेत्ररक्षण सामना फिरवू शकते; शिवाय गोलंदाजांनाही स्फूरण चढते, याचे तो सामना उत्तम उदाहरण ठरला.’’आॅस्ट्रेलियात वन डेत फिरकी गोलंदाजी मोलाची भूमिका वठवेल. खेळपट्टीचा वेध घेत आम्ही दोन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. न्यूझीलंडमधील स्थिती वेगळी असेल. तेथे गवत असेल. तेथे वेगवान माऱ्याला वाव असल्याने ईशांत आणि भुवनेश्वर संघात असावेत. उपांत्य फेरी भारत गाठेलच. त्यासाठी विराट कोहली आणि रोहित यांनी मोठी खेळी करायलाच हवी, असेही व्यंकटराघवन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)आजचे खेळाडू स्वत:ला पूर्णपणे खेळात झोकून देत नाहीत, खेळाडू महत्त्वाकांक्षी आहेत आणि खेळण्यास उत्साही आहेत; पण मैदानावर कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पंच राहिलेले एलिट पॅनलचे माजी सदस्य व्यंकटराघवन यांच्या मते भारत पहिल्या ४ संघांत स्थान मिळवू शकतो असे व्यंकटराघवन म्हणाले़