कुलदीपची सरप्राईज निवड

By Admin | Updated: October 5, 2014 01:32 IST2014-10-05T01:32:15+5:302014-10-05T01:32:15+5:30

उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघात निवड करून निवड समितीने सर्वाना ‘सरप्राईज’ दिले,

Kuldeep's surprise pick | कुलदीपची सरप्राईज निवड

कुलदीपची सरप्राईज निवड

>बंगलोर : उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या  वन-डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघात निवड करून निवड समितीने सर्वाना ‘सरप्राईज’ दिले, तर अमित मिo्राला पुन्हा अंतिम 14 जणांच्या चमूत संधी देण्यात आली.      भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन याला मात्र विo्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असून, दुखापतीमुळे रोहित शर्माऐवजी संघात मुरली विजय याने कमबॅक केले आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी येथे पार पडलेल्या बैठकीनंतर संघ निवडीची घोषणा केली. 
8 ऑक्टोबरला कोची येथे विंडिजविरुद्ध पहिली वन-डे होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा:या  या संघात युवराज सिंह, हरभजन सिंह, गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग या अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आलेले नाही. 19वर्षीय कुलदीपला संधी देत समितीने उत्तर प्रदेशच्या नव्या चेह:याला व्यासपीठ देण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुलदीपची निवड करताना समितीने अनुभवी गोलंदाज प्रग्यान ओझा याच्याकडेही कानाडोळा केला. सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेतील  कामगिरीमुळे त्याला  ही संधी मिळाली आहे.  भारतीय संघातील जलदगती गोलंदाजांच्या फौजेत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि उमेश यादव यांचे स्थान कायम राखण्यात आले आहे. अश्विनला विo्रांती दिल्याने फिरकीची मदार मिo्रा, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यांच्यावर असेल. रोहितच्या दुखापतीमुळे मुरलीची लॉटरी लागली. या मालिकेत शिखर धवन आणि अजिंक्य रहाणो हे सलामीला येण्याची शक्यता असून विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू आणि धोनी हे मधली फळी सांभाळतील. (वृत्तसंस्था)
 
भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणो, विराट कोहली, अंबाती रायडू, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, अमित मिo्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव.
बाहेर : आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, संजू सॅमसन, कर्न शर्मा. आत :  कुलदीप यादव, अमित मिo्रा
 
तीन वन-डे लढती
8 ऑक्टोबर : कोची
11 ऑक्टोबर : नवी दिल्ली
14 ऑक्टोबर : विशाखापट्टणम्

Web Title: Kuldeep's surprise pick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.