शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता नाइट रायडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2016 23:47 IST

कॅप्टन गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना 5 गडी राखून शानदार विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमत

बंगलोर, दि. 2- आयपीएलच्या नवव्या सीझनमध्ये कॅप्टन गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना 5 गडी राखून शानदार विजय मिळवला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सनं 19.1 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 189 धावा केल्या आहेत.कोलकाता नाइट रायडर्सच्या कॅप्टन गंभीरनं धडाकेबाज सुरुवात करत 29 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकार लगावत 37 धावांची आघाडी उभी केली. उथप्पा 1, पांडे 8, यादव 7 धावा काढून तंबूत परतले. लियाननं 12 चेंडूंत 1 षटकार खेचत 15 धावा काढल्या आहेत.
पठाणनं नाबाद खेळत 29 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारासह संघाला विजय मिळवून दिला आहे. तर रुसेलनंही 24 चेंडूंत 1 चौकार आणि 4 षटकार खेचत 39 धावांची आघाडी उभी केली.त्यामुळेच कोलकातानं कॅप्टन गंभीरच्या नेतृत्वात विजय मिळवला आहे.  
 कर्णधार विराट कोहली, के राहूल आणि शेन वॅटसनच्या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबीने निर्धारीत २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा केल्या होत्या. केकेआरला विजयासाठी २० षटकात १८६ धावांची गरज होती. 
स्फोटक फलंदाज ख्रिस गेल लदकर बाद झाल्यानंतर RCB संघावर थोडे दडपण आले पण. कर्णधार कोहली आणि के. राहूल यांनी सुरवातीला संयमी फलंदाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी ९.४ षटकात ८४ धावांची भागीदारी केली. के राहूलने स्फोटक फलंदाजी करताना ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. के राहूल बाद झाल्यानंतर आलेला डिव्हीलर फार काळ मैदानावर टिकला नाही धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात ४ धावावर बाद झाला. कोहलीने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना संयमी ५२ धावांची खेळी केली.
 
आघाडीचे सर्व फलंदाज बाद झाल्यानंतर शेन वॅटसनने सचिन बेबीला सोबत घेत हाणामारीच्या षटकात धावसंख्या वाढवण्याचे काम चोख बजावले. वॅटसन-सचिन बेबीने ५व्या विकेटसाठी २.२ षटकात ३८ धावांची भागीदारी केली. वॅटसनने २१ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. सचिन बेबीने ८ चेंडूत १६ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि १ षटकात लगावला. बेबी बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बिन्नीने ४ चेंडूत १६ धावा केल्या. 
 
केकेआरकडून स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलर्स आणि के. राहूलला चावलाने बाद केले. तर ख्रिस गेल आणि कर्णधार कोहलीला मॉर्केलने बाद केले. चावला-मॉर्केल सोडता इतर गोलंदाजाना आपली छाप सोडता आली नाही. १९ व्या षटकात रसेलने सचिन बेबीला बाद केले. तोपर्यंत सचिन बेबीने आपले काम फत्ते केले होते. यादवने ४ षटकात ५६ धावांच्या मोबदल्यात १ गडी बाद केला.