शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्याचा सनरायझर्सवर विजय

By admin | Updated: May 5, 2015 01:00 IST

: कोलकता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी केलेल्या ‘टाईट’ गोलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादपुढील १६८ धावांचे शक्य आव्हान अशक्यप्राय झाले अन्

कोलकाता : कोलकता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी केलेल्या ‘टाईट’ गोलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादपुढील १६८ धावांचे शक्य आव्हान अशक्यप्राय झाले अन् कोलकात्याने ३५ धावांनी बाजी मारली. सनरायझर्सचा संघ २० षटकांत ९ बाद १३२ धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. कोलकात्याकडून उमेश यादव आणि ब्रॅड हॉग यांनी प्रत्येकी दोन बळी घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले.विजयी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सनरायझर्सची सुरुवात धक्कादायक झाली. उमेश यादवने सलामीवीर तसेच कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा (४) पहिल्याच षटकात त्रिफळा उडवला. त्यानंतर याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर यादवने नमन ओझालाही (०) तंबूत पाठवले. यादवच्या सलग दोन धक्क्यांनी सनरायझर्स हादरले. त्यानंतर शिखर धवन (१५) आणि हेनरिक्स या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र ही जोडीसुद्धा तग धरू शकली नाही. हॉगच्या चेंडूवर धवन पांडेकरवी झेलबाद झाला. त्यानंतर इयान मॉर्गन (५), विहारी (६), विपुल शर्मा (१) हे झटपट बाद झाले. त्यामुळे सनरायझर्स १२ षटकांत ६ बाद ६९ अशा संकटात सापडले. हेन्रिक्स (४१) आणि कर्ण शर्मा (३२) यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही यश आले नाही. त्याआधी, ‘होमग्राउंड’वर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने मनीष पांडे (३३) आणि रॉबिन उथप्पा-गौतम गंभीरची अर्धशतकी भागीदारी यांच्या जोरावर ७ बाद १६७ धावा केल्या. आयपीएलमधील ३८व्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा या जोडीने आव्हान दिले. त्यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी या जोडीने ५७ धावांची भागीदारी केली. २३ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ३१ धावा करणाऱ्या गौतम गंभीरला कर्ण शर्माने मॉर्गनकरवी झेलबाद केले. गौतम परतताच रॉबिनलाही कर्ण शर्मानेच तंबूत पाठवले. शर्माच्या या दोन धक्क्यांमुळे कोलकाता नाईट रायडर्सची धावगती मंदावली. एका बाजूने मनीष पांडेने (३३) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पांडेसुद्धा दुर्दैवीपणे धावबाद झाला. त्या वेळी कोलकाता संघ ५ बाद १११ अशा स्थितीत होता. मध्यमफळीत युसूफ पठाणने अवघ्या १९ चेंडंूत ४ चौकारांच्या मदतीने ३० धावांची आक्रमक खेळी केल्यामुळे कोलकात्याला १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. जोनाथन बोथाने १२, तर सूर्यकुमार यादवने ६ धावा केल्या. सनरायझर्सकडून भुवनेश्वर कुमार आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन, तर प्रवीण कुमार व विपुल शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.