शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

केकेआरला सुपरजायन्टस्चा धोका

By admin | Updated: May 14, 2016 01:59 IST

प्ले आॅफच्या चढाओढीबाहेर झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायन्टस्ला आयपीएल नऊमध्ये आता गमविण्यासारखे काहीच नाही. इतर संघांचे गणित चुकविण्याचे काम मात्र हा संघच करू शकतो

कोलकाता : प्ले आॅफच्या चढाओढीबाहेर झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायन्टस्ला आयपीएल नऊमध्ये आता गमविण्यासारखे काहीच नाही. इतर संघांचे गणित चुकविण्याचे काम मात्र हा संघच करू शकतो. आज, शनिवारी होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला नेमक्या याच गोष्टीपासून सावध रहावे लागेल.मागच्या सामन्यात हैदराबादकडून पराभूत झालेला धोनीचा पुणे संघ स्पर्धेबाहेर पडलेला पहिलाच संघ आहे. या संघाला आपल्या वाट्याचे अद्याप तीन सामने खेळायचे आहेत. दुसरीकडे पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर केकेआर संघ नव्या जोमाने खेळणार आहे. केकेआरला गुजरातकडून झालेल्या पराभवाचा मोठा फटका बसला. हा संघ गुणतालिकेत खाली घसरला आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये केकेआरला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठविणारा फिरकी गोलंदाज सुनील नारायण यंदा फॉर्ममध्ये नाही. आतापर्यंत सहा सामन्यांत त्याला केवळ सहा बळी मिळाले. नेटस्वर घाम गाळणारा नारायण ब्रॅड हॉगचे स्थान घेण्याची शक्यता असल्याने विकेट फिरकीला अनुकूल बनविण्यात आली आहे. हा डाव मात्र केकेआरवर देखील उलटण्याची शक्यता वर्तविली जात आहे, कारण पुणे संघात आर. अश्विन आणि मुरुगन अश्विन, झम्पा असे तीन फिरकी गोलंदाज आहेत. प्ले आॅफमध्ये जाण्यासाठी केकेआरला चारपैकी २ सामने जिंकावे लागतील. पुण्याचा कर्णधार धोनी आश्चर्यकारक निर्णयामुळे टीकेचे लक्ष्य ठरला. दोन षटकांत २२ धावांची गरज असताना सर्वोत्कृष्ट फिनिशर असणारा धोनी बचावात्मक खेळला, त्यामुळे हैदराबादला चार धावांनी विजय शक्य झाला होता. धोनीने दहा सामन्यांत २१२ धावा केल्या. शिवाय अश्विनचा देखील त्याने संपूर्ण वापर केला नाही. अश्विनला अनेक सामन्यांत संपूर्ण चार षटके गोलंदाजी दिली नाही. (वृत्तसंस्था)