केकेआरला भासणार प्रमुख खेळाडूंची उणीव
By Admin | Updated: September 17, 2014 01:54 IST2014-09-17T01:54:03+5:302014-09-17T01:54:03+5:30
बुधवारी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेच्या ‘अ’ गटाच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

केकेआरला भासणार प्रमुख खेळाडूंची उणीव
हैदराबाद : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे कमकुवत झालेल्या आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघाला उद्या, बुधवारी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेच्या ‘अ’ गटाच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
आयपीएल टी-2क् स्पर्धेतील यशामुळे आत्मविश्वास उंचावलेला केकेआर संघ चॅम्पियन्स लीगमध्ये छाप सोडण्यास सज्ज आहे; पण स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा संघाला फटका बसला आहे. ािस लिन व मॉर्न मोर्कल दुखापतग्रस्त असून, बांगलादेशचा साकिब अल-हसनला बोर्डाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या खेळाडूंना संघात सहभागी होता आले नाही.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाला चॅम्पियन्स लीगमध्ये आजतागायत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. केकेआर संघाने 2क्11 व 2क्12 मध्ये साखळी फेरीत स्थान मिळविले होते; पण त्यापुढे मात्र आगेकूच करता आली नाही.
गंभीरव्यतिरिक्त केकेआर संघात ज्ॉक कॅलिस, रॉबिन उथप्पा व युसूफ पठाण यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे; पण संघाला साकिब व मोर्कलची उणीव भासणार आहे. कोलकाता संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी कसून सराव केला आहे. काल, सोमवारी केकेआर संघाने राजीव गांधी स्टेडियममध्ये सराव सामनाही खेळला. कॅलिसने रविवारी सराव सामन्यात 43 चेंडूंना सामोरे जाताना 3 चौकार व 4 षट्कारांच्या साहाय्याने 58 धावांची खेळी केली.
दुस:या बाजूचा विचार करता 2क्1क् चा चॅम्पियन संघ चेन्नई सुपरकिंग्ज महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जेतेपद पटकाविण्यास उत्सुक आहे.