'समर्थ' महाराष्ट्र! टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने पूर्ण केले ग्रीको-रोमनमध्ये 'सुवर्ण' जिंकण्याचे वडिलांचे स्वप्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 02:05 PM2024-01-30T14:05:31+5:302024-01-30T14:06:08+5:30

Khelo Indian Youth Games 2023 ( marathi news )  तामिळनाडू येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये ...

KIYG: Samarth, tempo driver’s son from Maharashtra village, lives ex-wrestler dad’s dream with Greco-Roman gold | 'समर्थ' महाराष्ट्र! टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने पूर्ण केले ग्रीको-रोमनमध्ये 'सुवर्ण' जिंकण्याचे वडिलांचे स्वप्न 

'समर्थ' महाराष्ट्र! टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने पूर्ण केले ग्रीको-रोमनमध्ये 'सुवर्ण' जिंकण्याचे वडिलांचे स्वप्न 

Khelo Indian Youth Games 2023 ( marathi news )  तामिळनाडू येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्राने पदकांचे शतक साजरे करुन अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या गावा-खेड्यांतून आलेल्या अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे. त्यापैकी एक म्हणजे कुस्तीपटू समर्थ महागवे ( Samarth Mahagave )...


कुस्तीचे बाळकडून कुटुंबातच मिळालेल्या समर्थने खेलो इंडिया युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याचे वडील आणि काका दोघेही प्रतिभावान कुस्तीपटू होते, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. कोल्हापूरजवळील पट्टण कोडोली गावात टेम्पो चालवणाऱ्या समर्थच्या वडिलांना आपल्याला जे जमले नाही ते मुलाने साध्य करावे अशी इच्छा होती. समर्थने त्याच्या वडिलांचे स्वप्न साकार केले आणि शनिवारी चेन्नई येथे सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ६० किलो ग्रीको-रोमन गटात सुवर्णपदक मिळवले. 


त्याच गावातील राज्यस्तरीय ग्रीको-रोमन पदक विजेते सोमनाथ यादव याच्यांकडे पाहून समर्थने लहानपणी हा खेळ निवडला. “तो सुरुवातीपासूनच ग्रीको-रोमन प्रकाराला अनुकूल होता. त्याच्या शरीराची रचना शैली यासाठी अनुकूल आहे, तसेच तो शरीराच्या वरच्या भागातून अधिक खेळेल,”असे  सोमनाथ यांनी सांगितले. सोमनाथने समर्थना आपल्या पंखाखाली घेतले आणि त्याला चार वर्षे प्रशिक्षण दिले. पण गावात आणि कुटुंबात संसाधने मर्यादित होती; वडिलांच्या तुटपुंज्या उत्पन्नासाठी समर्थची आई स्थानिक शाळेच्या स्वयंपाकघरात काम करते.


सोमनाथने आपले सर्वोत्तम प्रयत्न केले होते, पण पुढच्या स्तरावर जाण्यासाठी समर्थला आणखी मोठी उभारी हवी होती. तो भारतीय क्रीडा प्राधिकरण चाचणीसाठी आला आणि त्याची मुंबईतील SAI केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी निवड झाली. येथे, समर्थच्या खेळाने प्रशिक्षक अमोल यादव यांना प्रभावित केले. "त्याचं बेसिक एवढं मजबूत आहेत.  पकड घेणे आणि त्याचा गेम सेन्स चांगला आहे," असे प्रशिक्षक अमोल म्हणाले.


मुंबईत स्थलांतरित होऊनही, १२वी इयत्तेतील विद्यार्थी बालपणीचे प्रशिक्षक सोमनाथ यांच्याशी नियमित संपर्कात राहतो आणि त्यांना स्पर्धेत येऊन पाहण्यास सांगत असतो. सोमनाथ यांना ते खूप दिवस जमले नव्हते, पण सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेसाठी ते चेन्नईला येईन, असे वचन त्यांनी समर्थला दिले होते. सोमनाथ यांच्यासमोर समर्थने हरयाणाच्या सौरभसह एकाही प्रतिस्पर्ध्याला स्कोअर करू दिला नाही. ज्याच्याकडून तो डिसेंबरमध्ये राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत रौप्य फेरीत पराभूत झाला होता.


"आमची मुख्य स्पर्धा नेहमीच हरयाणाच्या मुलांशी असते, कारण ते कुस्तीमध्ये खरोखरच बलवान असतात,"असे प्रशिक्षक अमोल म्हणाले. “म्हणून आम्ही त्यानुसार रणनीती आखली होती. त्याने त्याला अजिबात गोल करू दिला नाही आणि तांत्रिक श्रेष्ठतेवर त्याला हरवले. ” प्रशिक्षक सोमनाथ यांचा चेन्नईचा दौरा सार्थ ठरला. "आमच्या छोट्या गावासाठी चॅम्पियन बनवणे खूप मोठे आहे,"असे ते म्हणाले. 

Web Title: KIYG: Samarth, tempo driver’s son from Maharashtra village, lives ex-wrestler dad’s dream with Greco-Roman gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.