खो-खो विश्वचषक २०२५ : भारतीय महिला संघाची दणदणीत विजयी सलामी; दक्षिण कोरियाला मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:04 IST2025-01-15T11:03:46+5:302025-01-15T11:04:17+5:30
पुरुषांमध्येही भारताने सलग दुसरा विजय मिळवताना ब्राझीलचा ६४-३४ असा ३० गुणांनी धुव्वा उडवला.

खो-खो विश्वचषक २०२५ : भारतीय महिला संघाची दणदणीत विजयी सलामी; दक्षिण कोरियाला मात
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यजमान भारताच्या महिला संघाने पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत जबरदस्त विजयी सलामी देताना दक्षिण कोरियाचा १७५-१८ असा तब्बल १५७ गुणांनी फडशा पाडला. दुसरीकडे, पुरुषांमध्ये भारताने सलग दुसरा विजय मिळवताना ब्राझीलचा ६४-३४ असा ३० गुणांनी धुव्वा उडवला. महिलांमध्ये एकतर्फी झालेल्या लढतीत भारतीयांकडून दक्षिण कोरियालाखो-खोचे धडेच मिळाले. मध्यंतरालाच ९४-१० अशी भलीमोठी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. चैथरा आर, कर्णधार प्रियांका इंगळे, मगाई माझी, मीनू, नसरीन शेख यांनी विजयात मोलाचे योगदान दिले. यानंतर पुरुषांमध्ये, ब्राझीलने भारतीयांविरुद्ध चांगली झुंज दिली.
१६ फळी केल्या बाद
- भारतीय महिलांनी कमालीचे वर्चस्व राखताना पहिल्या डावात आक्रमण करून दक्षिण कोरियाच्या तब्बल १६ फळी बाद केल्या.
- कोरियनच्या कोणत्याही फळीला भारतीय आक्रमकांपुढे १५-२० सेकंदांहून अधिक वेळ तग धरता आला नाही.
- अनुभवी भारतीयांपुढे त्यांचा ६ निभाव लागला नाही. मध्यंतराला ३६-१६ अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंनी वेगवान खेळ करत ब्राझीलला पुनरागमनाची संधी दिली नाही.
- कर्णधार प्रतीक वाईकर, रोकसन सिंग, आकाश कुमार, आदित्य गणपुले यांनी शानदार खेळ करत विजय साकारला.