खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची धडाकेबाज घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:26 PM2020-01-16T23:26:12+5:302020-01-16T23:27:23+5:30

बास्केटबॉलमध्ये विजयी सलामी

Khelo India: Maharashtra in Kho-Kho performing well, reach in 2nd round | खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची धडाकेबाज घोडदौड

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची धडाकेबाज घोडदौड

Next

गुवाहटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात खो-खो मध्ये महाराष्ट्राने १७ वर्षाखालील मुली व मुले तसेच २१ वर्षाखालील मुले व मुलींमध्ये लागोपाठ दुसरा विजय नोंदवित धडाकेबाज घोडदौड कायम राखली.      

 

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आसामचा १८-५ असा एक डाव १३ गुणांनी धुव्वा उडविला. त्याचे श्रेय ऋतुजा खरे (५ गडी व नाबाद ३ मिनिटे), रेश्मा राठोड (३ मिनिटे ४० सेकंद) व अपेक्षा सुतार (नाबाद ३ मिनिटे) यांच्या खेळास द्याावे लागेल. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने गुजरातला २०-११ असे दणदणीत पराभूत केले. त्या वेळी महाराष्ट्राकडून सौरभ अहिर (दीड मिनिटे व ४ गडी), सिद्धेश थोरात (२ मिनिटे व नाबाद १ मिनिट), रोहन कोरे (अडीच मिनिटे) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. गुजरातच्या विशाल तडवी (एक मिनिट ५० सेकंद व एक मिनिट १० सेकंद) याची लढत एकाकी ठरली.

    मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने हरियाणाचा १५-५ असा एक डाव १० गुणांनी धुव्वा उडविला. महाराष्ट्राच्या प्रांजल मडकर (साडेचार मिनिटे व २ मिनिटे १० सेकंद), श्रेया पाटील (साडेतीन मिनिटे व २ गडी) व प्रीति काळे (नाबाद साडेतीन मिनिटे) यांनी उल्लेखनीय खेळ केला. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आसाम संघास १७-११ असे निष्प्रभ केले. त्यांच्याकडून प्रवीण मगर (२ मिनिटे व एक मिनिट ५० सेकंद), अरुण गुणकी (५ गडी) व आदर्श मोहिते (२ गडी व अडीच मिनिटे) यांनी सिंहाचा वाटा उचलला.

* हॉकीत उत्तरप्रदेशची महाराष्ट्रावर मात
    मुलींच्या २१ वर्षाखालील गटात उत्कंठापूर्ण लढतीत ५१ व्या मिनिटाला अंशिका सिंग हिने केलेल्या गोलामुळेच उत्तरप्रदेशने महाराष्ट्रावर ४-३ असा विजय मिळविला. विनम्रता यादवने तीन गोल करीत उत्तरप्रदेशच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. महाराष्ट्राकडून भावना खाडे (२१ वे मिनिट), ऋतुजा पिसाळ (३५ वे मिनिट) व वैष्णवी फाळके (४५ वे मिनिट) यांनी गोल केले. महाराष्ट्राने यापूर्वीच उपांत्य फेरी निश्चित केली आहे.
    महाराष्ट्राला १७ वर्षाखालील मुलींच्या गटातही पराभव पत्करावा लागला. ओडिशाने त्यांचा ३-० असा पराभव केला. त्या वेळी ओडिशाकडून दीपामोनिका टोप्पो, अंशिका राऊत व ज्योती छेत्री यांनी प्रत्येकी एक गोल केला.

*बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राची विजयी सलामी
    महाराष्ट्राने मुलींच्या २१ वर्षाखालील गटात कर्नाटक संघाचा ८६-५८ असा पराभव करीत शानदार प्रारंभ केला. पूर्वार्धात त्यांनी ४२-१९ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून सुझानी पिंटो हिने उल्लेखनीय खेळ केला.

Web Title: Khelo India: Maharashtra in Kho-Kho performing well, reach in 2nd round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.