शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक-तमिळनाडूत आजपासून फायनल

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

रणजी करंडक : अंतिम सामना चुरशीचा ठरणार

रणजी करंडक : अंतिम सामना चुरशीचा ठरणार
मुंबई : विजेतेपद कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असलेला गत चॅम्पियन कर्नाटक उद्यापासून येथे वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूचे कडवे आव्हान पेलण्यास सज्ज आहे.
दक्षिण विभागाच्या दोन्ही संघांत देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे ही लढत रोमहर्षक ठरण्याची चिन्हे आहेत. १९७३-७४मध्ये प्रथम रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिंकणार्‍या कर्नाटकाने गतवर्षी आपले सातवे अजिंक्यपद पटकावले होते, तर तुलनेत आतापर्यंत फक्त दोनदाच चॅम्पियनचा बहुमान मिळवणार्‍या तमिळनाडूने याआधी १९८७-८८मध्ये हे विजेतेपद आपल्या नावावर केले होते.
गत चॅम्पियन कर्नाटक दोन वर्षांपासून अजेय आहे आणि उद्यापासून सुरू होणार्‍या अंतिम सामन्यात हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात पाऊल ठेवेल. या संघाने याआधी पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यातदेखील तमिळनाडूचा २८५ धावांनी पराभव केला होता आणि या हंगामातील तमिळनाडूचा हा एकमेव पराभव ठरला होता.
कर्नाटकाच्या फलंदाजीच्या फळीला चांगला सूर गवसला आहे. रॉबिन उथप्पाने या हंगामात ९१२ धावा केल्या असून, या संघात तो अव्वल स्थानी आहे. श्रेयस गोपाल, रविकुमार सर्म आणि के. एल. राहुल यांनीदेखील ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
कर्नाटकासाठी एकमेव चिंतेची बाब ही सी. ए. गौतम याचा फिटनेस आहे. तो स्नायूदुखीने त्रस्त आहे.
गोलंदाजीत कर्नाटकाची मदार ही कर्णधार आर. विनयकुमार, अभिमन्यू मिथुन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीनाथ अरविंद यांच्यावर असेल. या तिघांनी ११६ पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
दुसरीकडे, तमिळनाडूच्या अव्वल सहा फलंदाजांत भारताचा कसोटीतील सलामीवीर मुरली विजय, अभिनव मुकुंद, दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि जुळे बंधू बाबा अपराजित व बाबा इंद्रजित यांचा समावेश आहे. त्यामुळे उद्यापासून बॅट आणि चेंडूंत रोमाचंक लढत पाहायला मिळेल.
कर्णधार मुकुंदने तमिळनाडूकडून सर्वाधिक ८१० धावा केल्या आहेत. कार्तिकने ७,३५३ आणि इंद्रजितने ६६८ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत तमिळनाडूकडून ऑफस्पिनर मालोलन रंगराजनने ३३, तर डावखुरा फिरकी गोलंदाज राहिल शाहने २७ गडी बाद केले. याआधी तमिळनाडूने २०११-१२मध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती; परंतु तेव्हा त्यांना राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)
०००