शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकची सामन्यावर मजबूत पकड

By admin | Updated: March 20, 2015 02:10 IST

करुण नायर (८०) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रणजी विजेत्या कर्नाटकने इराणी ट्रॉफी सामन्यावर मजबूत पकड मिळवताना तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४१ अशी मजल मारली.

बंगळुरू : मोक्याच्या वेळी फॉर्ममध्ये आलेला मनिष पांड्ये (नाबाद ७३) आणि आर. समर्थ (८१) व करुण नायर (८०) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रणजी विजेत्या कर्नाटकने इराणी ट्रॉफी सामन्यावर मजबूत पकड मिळवताना तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४१ अशी मजल मारली. कर्नाटककडे आता ३२१ धावांची भक्कम आघाडी असून सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक आहेत.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात कर्नाटकच्या फलंदाजांनी शेष भारताची गोलंदाजी चांगल्याप्रकारे खेळून काढली. बिनबाद ३९ धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना कर्नाटकला लवकरच पहिला धक्का बसला. मयांक अगरवालला (२८) झेलबाद करून वरुण अ‍ॅरोनने आपला धडाका कायम राखला. यानंतर समर्थ आणि रेड्डी (३१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करीत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यानंतर ठाकूर, अ‍ॅरोन आणि ओझा यांनी अचूक मारा करताना कर्नाटकला ठरावीक अंतराने धक्का देत त्यांची ४ बाद १८२ अशी कोंडी केली. समर्थने १५९ चेंडू खेळून काढताना १० चौकारांसह ८१ धावा फटकावल्या.कर्नाटक अडचणीत सापडले असल्याचे दिसत असतानाच नायर आणि पांड्ये यांनी पाचव्या विकेटसाठी १०६ धावांची शतकी भागीदारी रचली. ही जोडी शेष भारताची डोकेदुखी ठरत असतानाच पुन्हा एकदा ओझाने निर्णायक कामगिरी करताना नायरची बहुमूल्य विकेट मिळवली. नायरने १२३ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांसह ८० धावांची संयमी खेळी केली. यानंतर आलेल्या श्रेयश गोपालला भोपळा फोडता न आल्याने कर्नाटकची ६ बाद २८९ धावा अशी अवस्था झाली.मात्र संघाची स्थिती जाणून कर्णधार विनय कुमारने रणजी अंतिम सामन्यातील फलंदाजीची पुनरावृत्ती करताना पांड्येला उपयुक्त साथ दिली. पांड्ये आणि विनय यांनी दिवसभरात कर्नाटकला तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३४१ अशी मजल मारून दिली.शेष भारतकडून वरुण अ‍ॅरोन (२/८५) आणि प्रग्यान ओझा (२/९३) यांनी नियंत्रित मारा करताना कर्नाटकला रोखण्याचा प्रयत्न केला. तर रिषी धवन व शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.संक्षिप्त धावफलक :च्कर्नाटक (पहिला डाव) : सर्व बाद २४४ धावा.च्शेष भारत (पहिला डाव) : सर्व बाद २६४ धावा.च्कर्नाटक (दुसरा डाव) : समर्थ त्रि. गो. ठाकूर ८१, अगरवाल झे. जाधव गो. अ‍ॅरोन २८, रेड्डी पायचीत गो. ओझा ३१, उथप्पा त्रि. गो. अ‍ॅरोन ६, नायर पायचीत गो. अ‍ॅरोन ८०, पांड्ये खेळत आहे ७३, गोपाल झे. नमन ओझा गो. धवन ०, विनय खेळत आहे २८. अवांतर - १४. एकूण : ९३ षटकांत ६ बाद ३४१ धावा.गोलंदाजी : धवन २१-१-७४-१; अ‍ॅरोन २०-२-८५-२; ठाकूर २१-४-६०-१; ओझा २६-३-९३-२; जाधव ४-०-१६-०; तिवारी १-०-६-०.