कालिस टी-20 वर आपले ध्यान केंद्रित करू इच्छितोय
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:20+5:302014-10-03T22:56:20+5:30

कालिस टी-20 वर आपले ध्यान केंद्रित करू इच्छितोय
>हैदराबाद: चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यफेरीमध्ये आपल्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला किताबी लढतीमध्ये पोहोचविणार्या ज्ॉक्स कालिसने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर आता तो टी-20 क्रिकेटवर आपले संपूर्ण ध्यान केंद्रित करू इच्छितोय़ दक्षिण आफ्रिकेच्या माजी अष्टपैलू कॅलिसने म्हटले की, मी आता खूप कमी क्रिकेट खेळणार आह़े यासाठी मी आता अधिक उत्साह आणि ऊर्जासोबत खेळेऩ यामुळे मला टी-20 क्रिकेटवर काम करण्यासाठी वेळही मिळणार आह़े मी एक सवरेत्कृष्ट टी-20 खेळाडू बनू इच्छितोय, असेही त्याने म्हटल़े