ज्यु. विश्वकप नेमबाजी; अनिश भानवालाला सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:39 IST2019-07-18T00:39:06+5:302019-07-18T00:39:22+5:30
भानवालाने २५ मीटर एअर पिस्तूल रॅपिड फायर पात्रता फेरीत ५८४ गुण मिळवले.

ज्यु. विश्वकप नेमबाजी; अनिश भानवालाला सुवर्ण
नवी दिल्ली : जर्मनीतील सुहल येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ ज्यु. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी भारताच्या अनिश भानवाला याने सुवर्णपदक पटकावले.
भानवालाने २५ मीटर एअर पिस्तूल रॅपिड फायर पात्रता फेरीत ५८४ गुण मिळवले. अंतिम फेरीतही त्याने २९ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम फेरीत भारताचे अन्य दोन खेळाडूही होते. आदर्श सिंग (१७) चौथे, तर अग्नेया कौशिकने (९) सहावे स्थान पटकावले.
रशियाच्या इगोर इस्माकोव्ह रौप्य, तर जर्मनीच्या फ्लोरियन पीटरने कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत ८ सुवर्ण, ७ रौप्य व ३ कास्यंपदक पटकावले आहेत.