जीव आॅस्ट्रियामध्ये ३० व्या स्थानावर
By Admin | Updated: June 14, 2015 01:51 IST2015-06-14T01:51:52+5:302015-06-14T01:51:52+5:30
भारतीय गोल्फर जीव मिल्खा सिंग खराब हवामानामुळे लियोनेस ओपनच्या तिसऱ्या फेरीचा खेळ जेव्हा रद्द

जीव आॅस्ट्रियामध्ये ३० व्या स्थानावर
एटनेजब्रुग (आॅस्ट्रिया) : भारतीय गोल्फर जीव मिल्खा सिंग खराब हवामानामुळे लियोनेस ओपनच्या तिसऱ्या फेरीचा खेळ जेव्हा रद्द करण्यात आला तेव्हा ७२ च्या स्कोअरसह तो संयुक्त ३० व्या स्थानावर खेळत होता़ जीवने तिसऱ्या फेरीमध्ये दोन बर्डी केले तर त्याने एक डबल बोगीदेखील केले़ त्याचे एकूण स्कोअर दोन अंडर २१४ इतके झाले आहेत.कालपर्यंत अव्वल स्थानावर असलेला फ्रान्सचा ग्रेगरी बोर्डीची चार शॉटची आघाडी आता केवळ दोन शॉटवर राहिली़