शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

...त्याची झळ बसली : कोहली

By admin | Updated: March 21, 2017 06:45 IST

डावाच्या मधल्या षटकांमध्ये चेंडू हार्ड नसल्याची झळ बसली आणि त्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नाही

डावाच्या मधल्या षटकांमध्ये चेंडू हार्ड नसल्याची झळ बसली आणि त्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. उपाहारानंतरच्या सत्रामध्ये भारताला बळी घेता आला नाही. त्या वेळी पीटर हँडस्कोंब व शॉन मार्श खेळपट्टीवर होते. कोहली म्हणाला, ‘रविवारी रात्री चेंडू नवा होता, त्या वेळी तो चांगला वळत होता. आज सकाळच्या सत्रातही चेंडू चांगला होता. पण, उपाराहानंतर चेंडूचा हार्डनेस कमी झाला. खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू वेगाने जात नव्हता. पाचव्या दिवशी खेळपट्टी संथ झाली होती. आम्ही नव्या चेंडूने काही बळी घेतले, पण मधल्या षटकांमध्ये चेंडू हार्ड नसल्यामुळे फटका बसला.’ पहिल्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. त्या वेळी गोलंदाजांचे काम सोपे नव्हते. दुसऱ्या डावात त्यांनी चांगली फलंदाजी केली. विराटचा आरोप स्मिथने फेटाळला-आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांचा अपमान केल्याचा आरोप कर्णधार विराट कोहलीने केला आहे, तर प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्हन स्मिथने कोहलीचा आरोप फेटाळला आहे. कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी (चार ते पाच) पॅट्रिक यांचे नाव घेतले. ते आमचे फिजिओ आहेत. आमच्यावर उपचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्या खेळाडूंनी असे का केले, याचे कारण मला कळले नाही. त्या खेळाडूंनी पॅट्रिकचे नाव का घेतले, याबाबत तुम्ही त्यांना विचारायला हवे.’कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. फरहार्ट यांनी मैदानावर धाव घेतली; पण कोहलीला फिजिओसह मैदान सोडावे लागले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल कोहलीच्या दुखापतीची खिल्ली उडवीत असल्याचे दिसून आले. भारतीय कर्णधारानेही रविवारी वॉर्नर बाद झाल्यानंतर तशीच प्रतिक्रिया दिली होती.