शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीताच्या वेळी शांतता! इराण महिला संघाची जगभर सुरू झाली चर्चा; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:05 IST

Iran Women's Football Team Refuses To Sing National Anthem : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील सीबस सुपर स्टेडियमवर इराण आणि दक्षिण ...

Iran Women's Football Team Refuses To Sing National Anthem : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील सीबस सुपर स्टेडियमवर इराण आणि दक्षिण कोरिया महिला संघात एएफसी महिला आशियाई कप २०२६ स्पर्धेतील सलामीची सामना खेळवण्यात आला. या स्पर्धेतील उद्घाटनाच्या सामन्यात इराण महिला संघाने मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  मैदानात  शांततापूर्ण निषेध नोंदवला.  

राष्ट्रगीताच्या वेळी जे घडलं त्याची जगभरात रंगतीये चर्चा

दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी ज्यावेळी इराणचे राष्ट्रगीत वाजवले गेले त्यावेळी इराणच्या कोणत्याही खेळाडूने किंवा मुख्य प्रशिक्षक मरझियेह जाफरी यांनी राष्ट्रगीत गायले नाही.  कोणत्याही खेळाच्या मैदानात ज्यावेळी राष्ट्रगीत सुरु होते त्यावेळी खेळाडू राष्ट्रगीत गाताना पाहायला मिळते. पण दक्षिण कोरिया आणि इराण महिला संघातील फुटबॉल सामन्यात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. महिला संघातील खेळाडू नेहमीप्रमाणे सामन्यापूर्वी रांगेत उभ्या राहिल्या; मात्र राष्ट्रगीत सुरू असताना त्या सरळ पुढे पाहत शांत उभ्या राहिल्या. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई (Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

 भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सुखरूप भारतात परतली; 'या' लोकांचे मानले आभार!

इराणमध्ये महिला अधिकारांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सरकारच्या काही धोरणांविरोधात विविध स्तरांवर नाराजी व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले आहे. पण आता  खेळाच्या मैदानातून  महिला फुटबॉलपटूंनी जागतिक स्तरावर देशातील सध्याची परिस्थिती आणि सरकाविरोधातील आपली भूमिका मांडल्याचे मानले जात आहे. ज्याची जगभरात चर्चा  सुरु आहे.   

इराणच्या संघाचा एकतर्फी पराभव, तरी... एएफसी महिला आशियाई कप २०२६ स्पर्धेत दक्षिण कोरिया महिला संघाविरुद्धच्या सामन्यात इराणच्या महिला संघाला ३-० अशा पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण कोरियाकडून किम हे-री हिने दोन तर चोई यू-री हिने एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इराणच्या संघाला एकही गोल नोंदवला आलानाही. पण या पराभवानंतर इराणचा संघ आपल्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. इराणच्या संघाचा एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी मुख्य प्रशिक्षक जाफरी यांनी संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. कोरिया हा आशियातील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे, त्यामुळे सामना कठीण असेल याची आम्हाला जाणीव होती. त्यांनी उत्कृष्ट खेळ केला, त्यांचे अभिनंदन. मात्र आम्ही स्पर्धेत जोरदार पुनरागमन करू, अशी आशा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Women's Team's Anthem Protest Sparks Global Discussion: What Happened?

Web Summary : The Iranian women's football team silently protested during their national anthem at the AFC Women's Asian Cup against South Korea, refusing to sing amidst Middle Eastern tensions following the death of Iran's supreme leader. Despite a 3-0 defeat, their silent demonstration has sparked global discussion.
टॅग्स :FootballफुटबॉलIranइराणSouth Africaद. आफ्रिकाAmericaअमेरिकाIsraelइस्रायल