शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

IPL 2022, CSK : नीरज चोप्रा दिसणार चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत; गोल्डन बॉयला IPL फ्रँचायझीकडून १ कोटींचं बक्षीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 3:48 PM

नीरजनं ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर CSKनं भालाफेकपटूचा गौरव करणार असल्याची घोषणा केली होती आणि आज त्यांनी तो शब्द पाळला.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला ( Neeraj Chopra)  IPL मधील फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) १ कोटी रुपयांचं बक्षीस आणि खास जर्सी गिफ्ट म्हणून दिली. नीरजनं टोकियोत भालाफेकीत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले आणि २००८नंतरचे भारताचे ऑलिम्पिक स्पर्धेतील हे पहिलेच वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. याहीपेक्षा १२५ वर्षांच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले. त्यामुळेच नीरजवर बक्षिसांचा वर्षाव झाला. शनिवारी उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी नीरजला स्पेशल गाडी गिफ्ट केली आणि आज CSKनं १ कोटींसह त्याच्यासाठी बनवलेली खास  जर्सी भेट म्हणून दिली. 

नीरजनं ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर CSKनं भालाफेकपटूचा गौरव करणार असल्याची घोषणा केली होती आणि आज त्यांनी तो शब्द पाळला.  CSKनं नीरजसाठी तयार केलेल्या  खास  जर्सीवर ८७५८ हा क्रमांक लिहिला आहे. नीरजनं ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळेच CSKनं जर्सीवर हा क्रमांक लिहिला. CSKचे सीईओ केएस विश्वनाथन म्हणाले की,''नीरजचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. मैदानी स्पर्धेत पहिलं ऑलिम्पिक पदक तेही सुवर्ण जिंकून नीरजनं पुढील पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. ८७.५८ हा नंतर भारतीय क्रीडा इतिहासात अजरामर झाला आहे. ही जर्सी त्याला प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे.''नीरज चोप्रा म्हणाला,''दिलेल्या पाठिंब्यासाठी व बक्षीसासाठी आभार. मागील दोन महिने प्रचंड व्यग्र  होतो आणि हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. सुवर्णपदक जिंकल्यानंतर एवढं प्रेम मिळेल, याची कल्पना नव्हती.''

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राChennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्सIPLआयपीएल २०२१Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021