शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: चेन युफेईवर मात, पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 2:41 AM

पहिल्या गेममध्ये सिंधू आणि चेन युफेन यांच्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये फक्त दोन गुणांच्या फरकाने सिंधू जिंकली.

जकार्ता : ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू हिने शनिवारी ऑल इंग्लंड चॅम्पियन चेन युफेई हिच्यावर सरळ सेटमध्ये मात करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना आज, रविवारी होणार आहे.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चेनवर सिंंधूने २१-१९, २१-१० अशा फरकाने विजय नोंदविला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सिंधूने सिंगापूर आणि इंडिया ओपनची उपांत्य फेरी गाठली. फायनलमध्ये तिची गाठ जपानची चौथी मानांकित अकाने यामागुची हिच्याविरुद्ध पडेल. मागील चार लढतीत सिंधूने यामागुचीला नमविले आहे. ऑस्ट्रेलियन, स्विस आणि ऑल इंग्लंड ओपन जिंकणारी चेन यंदाच्या मोसमात दमदार खेळ करीत होती. सिंधूने मात्र तिला संधीच दिली नाही.

पहिल्या गेममध्ये सिंधू आणि चेन युफेन यांच्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये फक्त दोन गुणांच्या फरकाने सिंधू जिंकली. पहिला गेम जिंकल्यावर मात्र सिंधूचा आत्मविश्वास दुणावला. दुसºया गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवून सामना जिंकला. सामना मोठ्या रॅलीजने सुरू झाला. त्यावेळी सिंधू ४-७ अशी पिछाडीवर होती. त्यानंतरही सिंधूने सलग पाच गुणांची कमाई करीत वर्चस्व गाजवले. ब्रेकनंतर सिंधूने आठपैकी सात गुण खेचून आणले आणि गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये४-० ने आघाडी मिळविताच सिंधूने वेगवान स्मॅश मारून खेळावर प्रभुत्व गाजवले. 

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू