शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक मालिकेसाठी आयसीसीला साकडे

By admin | Updated: September 13, 2015 04:11 IST

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी आपला शेजारी देश भारतासोबत क्रिकेट मालिकेच्या आयोजनाविषयीचे प्रयत्न सुरूच ठेवले असून, त्यांनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी आपला शेजारी देश भारतासोबत क्रिकेट मालिकेच्या आयोजनाविषयीचे प्रयत्न सुरूच ठेवले असून, त्यांनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला राजी करावे, यासाठी मध्यस्थी करण्याचा आग्रह केला. शहरयार खान पीसीबीचे अध्यक्ष असताना २००३ ते २००६ दरम्यान दोन्ही देशांत खूप क्रिकेटचे सामने झाले; परंतु त्यांनी पद सोडल्यानंतर भारत-पाक संघांत एकाही क्रिकेट मालिकेचे आयोजन होऊ शकले नव्हते. पीसीबी अध्यक्ष आणि आयसीसी अध्यक्षांदरम्यान झालेल्या चर्चेच्या एक दिवस आधी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनीदेखील दोन्ही देशांतील मालिकेचे महत्त्व मान्य केले होते. सुरक्षिततेच्या मुद्द्यावर दोन्ही देश समाधानी असल्यास निश्चितच चाहत्यांना दोन्ही प्रतिस्पर्धी संघांची रोमहर्षक लढत पाहावयास मिळेल. याशिवाय, द्विपक्षीय मालिका झाल्यामुळे पीसीबीलादेखील आपल्या आर्थिक स्थितीतून सावरण्यास मदत होईल, असे रिचर्डसन यांनी म्हटले होते. आयसीसी अध्यक्ष झहीर अब्बास यांच्यासोबत शुक्रवारी गद्दाफी स्टेडियम दौऱ्यादरम्यान भारतासोबत डिसेंबरमध्ये तटस्थ स्थळी अरब अमिरात येथे द्विपक्षीय मालिकेच्या शक्यतेविषयी सविस्तर चर्चा झाली. मी आयसीसी अध्यक्षांना दोन्ही देशांतील खेळाचे संबंध चांगले होण्यासाठी तुम्ही बीसीसीआयशी चर्चा करावी आणि त्यांना राजी करण्याचे प्रयत्न करण्याचा आग्रह केला. आयसीसी अध्यक्षांसोबत झालेली चर्चा खूप सकारात्मक झाली आणि दोन्ही देशांतील क्रिकेट पुन्हा एकदा सुरू होईल, अशी आशा करतो.- शहरयार खान, पीसीबी अध्यक्ष