शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक मालिका सरकारच्या निर्णयावर अवलंबून

By admin | Updated: December 8, 2015 23:48 IST

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका खेळविण्यात आलेल्या खेळपट्टीवर चौफेर टीका होत आहे; परंतु भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने मात्र

औरंगाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका खेळविण्यात आलेल्या खेळपट्टीवर चौफेर टीका होत आहे; परंतु भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने मात्र, ‘ही चर्चा निरर्थक आहे. खेळपट्टी खेळण्यायोग्य होती,’ असे मत व्यक्त केले.व्हेरॉक समूहातर्फे आयोजित आंतरशालेय व औद्योगिक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लक्ष्मण मंगळवारी औरंगाबादेत आला होता. आपल्या शैलीदार कलात्मक फलंदाजीने २००१मध्ये कोलकता येथे प्रतिकूल परिस्थितीत २८१ धावांची मॅरेथॉन खेळी करून स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताला संस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या लक्ष्मणने दक्षिण आफ्रिका-भारत, वर्ल्डकप आणि अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्याविषयी आपली मते मनमोकळेपणाने मांडली.दक्षिण आफ्रिकेसारख्या नंबर वन देशाला धूळ चारणाऱ्या भारताच्या दिल्लीतील कसोटी विजयाबद्दल छेडले असता, लक्ष्मण म्हणतो... या कसोटीचे श्रेय आपण दक्षिण आफ्रिका आणि भारतीय गोलंदाजांना देऊ. दक्षिण आफ्रिकेने दिल्ली कसोटीआधी पूर्ण मालिकेतच फायटिंग स्पिरीट दाखविले नाही; परंतु त्यांनी दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दाखविलेली झुंजार वृत्ती प्रशंसनीय आहे. अ‍ॅबी डिव्हिलियर्ससारख्या स्फोटक फलंदाजानेही तब्बल ३५४ चेंडू खेळताना किल्ला लढवताना ४३ धावा केल्या. दुसरे श्रेय भारतीय गोलंदाजांना आहे. कर्णधार विराट कोहलीने चांगली कॅप्टनशिप केली. आफ्रिकेचे फलंदाज भागीदारी करीत असतानाही त्याने हार मानली नाही आणि गोलंदाजांनीही त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पेलली. तथापि, लक्ष्मणने दक्षिण आफ्रिकेच्या गेमप्लॅनविषयी नाराजीही व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जरी यश मिळविले, तरी भारतीय संघ परदेशातील उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर यशस्वी ठरेल का, असे छेडले असता लक्ष्मण म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका येथील खेळपट्ट्यांवर अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि मुरली विजय यांनी स्कोअर केला आहे. तथापि, तेथील खेळपट्ट्यांवरील यश चिंतेची बाब आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण खेळी करणे योग्य असते. अशा प्रकारची खेळी अजिंक्य रहाणे याने दिल्ली कसोटीत करून दाखविली. त्याने प्रतिकिूल स्थितीतही परिस्थितीशी जुळवून घेताना दोन्ही डावांत बहारदार खेळी करून परिपक्वता दाखविली. या मालिकेमुळे भारताला मॅचविनिंग गोलंदाज आणि फलंदाज मिळाले; त्यामुळे भारत रँकिंगमध्ये कसोटीत नक्कीच नंबर वन बनेल.’’दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यातील मालिकेत खेळपट्टीवर टीका होत आहे. याविषयी लक्ष्मणने सांगितले, ‘‘या मालिकेत सामने खेळवण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजांसाठी पोषक होत्या. नागपूर येथील खेळपट्टीही खेळण्यालायक नव्हती, असे म्हणता येणार नाही. येथील खेळपट्टीवर माती थोडी सैल होती आणि ती आवश्यक अशी रोल केलेली नव्हती. तथापि, या खेळपट्टीवर धावा निघाल्या नसल्या, तरी भारताकडून मुरली विजय व साहा यांनी चांगली फलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेकडूनही हाशीम आमला आणि फाफ ड्यू प्लेसीस यांनी चांगली फलंदाजी केली. आमलाने १६७ आणि फाफ ड्यू प्लेसिसने १५२ चेंडूंचा सामना केला. त्यामुळे ही खेळपट्टी धोकादायक होती, असे म्हणता येणार नाही. खेळपट्टी टफ होती. खेळपट्टीशी जुळवून फलंदाजी करणे महत्त्वाचे होते. रोहित शर्मा वनडेत प्रभावी ठरत असताना कसोटीत मात्र तो तितका यशस्वी ठरला नाही. याविषयी लक्ष्मण म्हणतो.. वनडेत दोन द्विशतके झळकावणाऱ्या रोहितमध्ये ठासून गुणवत्ता भरलेली आहे. त्याने वनडेत स्वत:ला सिद्ध केले आहे. नागपूर कसोटीत तो चांगल्या चेंडूवर बाद झाला; परंतु दिल्ली कसोटीतील पहिल्या डावात तो खराब पद्धतीने बाद झाला. रोहितने शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा करायला हवी. माझ्या मते, तो भारताचा मॅचविनर फलंदाज आहे आणि नक्कीच तो वनडेप्रमाणेच कसोटीतही स्वत:ला सिद्ध करील, असा विश्वास वाटतो.’’(क्रीडा प्रतिनिधी)