शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

गोल्ड मेडल स्वीकारताना भारताचा तिरंगा पाहून चानूच्या डोळयात तरळले अश्रू, वेटलिफ्टिंगमध्ये 22 वर्षानंतर भारताला मिळाले पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 4:28 PM

वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत साईखोम मीराबाई चानूने 194 किलो वजन उचलून नवीन विश्वविक्रम रचला आहे.

ठळक मुद्देचानूच्या आधी कर्णम मल्लेश्वरीने 1994 आणि 1995 साली गोल्ड मेडल मिळवले होते.पोडियमवर पदक स्विकारण्यासाठी उभं राहिल्यानंतर भारताचा तिरंगा पाहून चानूच्या डोळयात अश्रू तरळले.

नवी दिल्ली - वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत साईखोम मीराबाई चानूने 194 किलो वजन उचलून नवीन विश्वविक्रम रचला आहे. या कामगिरीसह चानूने सुवर्णपदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर आहे. 22 वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने भारताकडून पहिली वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. 

अमेरिकेतील अनहिम येथे आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत चानूने 48 किलो वजनी गटात पहिल्यांदा 85 किलो आणि दुस-यांना 109 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. चानूच्या आधी कर्णम मल्लेश्वरीने 1994 आणि 1995 साली गोल्ड मेडल मिळवले होते. मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकही मिळवले होते. 

पोडियमवर पदक स्विकारण्यासाठी उभं राहिल्यानंतर भारताचा तिरंगा पाहून चानूच्या डोळयात अश्रू तरळले. थायलंडच्या सुकचारोन तुनियाने रौप्य आणि सेगुराने इरिसने कांस्यपदक पटकावले. डोपिंगच्या प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्ता, युक्रेन आणि अझरबैजान या देशाचे वेटलिफ्टर्स स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. 

रियो ऑलिम्पिकमध्ये चानूने अत्यंत निराशाजनक प्रदर्शन केले होते. 48 किलो वजनी गटात क्लीन आणि जर्कच्या तीन प्रयत्नात चानू अपयशी ठरली होती. पण यावर्षी चानूने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून चानूने पुढच्यावर्षी होणा-या राष्ट्रकुल स्पर्धेतही आपले स्थान निश्चित केले.  

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानू