भारताच्या सचिन राठीची सुवर्णपदकाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 18:01 IST2018-07-22T18:00:57+5:302018-07-22T18:01:31+5:30

भारताचा कुस्तीपटू सचिन राठीने आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

India's Sachin Rathi's gold medal | भारताच्या सचिन राठीची सुवर्णपदकाला गवसणी

भारताच्या सचिन राठीची सुवर्णपदकाला गवसणी

ठळक मुद्देसचिनने 74 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मंगोलियाच्या बॅट एरडन्सला पराभूत केले आणि सुवर्णपदक पटकावले.

नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू सचिन राठीने आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. सचिनने 74 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मंगोलियाच्या बॅट एरडन्सला पराभूत केले आणि सुवर्णपदक पटकावले.


भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाने या स्पर्धेच्या 86 किलो वजनी गटामध्ये प्रवेश केला आहे. आता दीपकही सचिनसारखे सुवर्णपदक पटकावतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर भारताच्या मोहितने 125 किलो वजनी गटामध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.



 

Web Title: India's Sachin Rathi's gold medal