भारताची सलामी बेल्जियमशी

By Admin | Updated: May 31, 2014 05:47 IST2014-05-31T05:47:34+5:302014-05-31T05:47:34+5:30

भारताची वर्ल्डकपमधील सलामीची लढत बेल्जियम संघाविरुद्ध आहे

India's opening match against Belgium | भारताची सलामी बेल्जियमशी

भारताची सलामी बेल्जियमशी

हेग : भारतीय हॉकी संघ १९७५ मध्ये फक्त एकदाच वर्ल्डकप जिंकणार्‍या संघाकडून प्रेरणा घेतल्यानंतर हॉलंडच्या हेग येथे शनिवारी सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत कोट्यवधी चाहत्यांच्या आशेने प्रेरित होऊन इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताची वर्ल्डकपमधील सलामीची लढत बेल्जियम संघाविरुद्ध आहे. विद्यमान जागतिक क्रमवारीत बेल्जियम पाचव्या क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ आठव्या स्थानी आहे; परंतु वर्ल्डकपचा विचार होता तेव्हा देशाकडून खेळण्यासाठी जबरदस्त उत्साहात रँकिंग मागे पडले जाते. कर्णधार सरदारसिंग सेना यंदा वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरीसाठी कटिबद्ध आहे. भारताने १९७१ मध्ये सुरू झालेल्या वर्ल्डकपमध्ये तिसरा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर १९७३ मध्ये हॉलंडच्या एम्सटलवीनमध्ये दुसर्‍या वर्ल्डकपमध्ये भारत यजमान हॉलंडकडून पराभूत झाला होता व त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते; परंतु भारताने १९७५ मध्ये मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये पाकिस्तानला २-१ गोलने जिंकताना एकमेव वर्ल्डकप जिंकला होता. या यशानंतर भारताला या स्पर्धेत कधीही उपांत्य फेरी गाठता आली नाही. कर्णधार सरदारच्या आग्रहाखातर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने दिल्लीत भारतीय हॉकीपटूंची भेट घेऊन त्यांना विजयाचा गुरुमंत्र दिला होता. याशिवाय १९७५ च्या वर्ल्डकप संघाचा कर्णधार अजितपालसिंग व अन्य खेळाडूंनीदेखील शुभेच्छा संदेश दिले होते. संघाचे प्रमुख प्रशिक्षक वॉल्श म्हणाले, ‘‘खेळाडूंत आत्मविश्वास आहे आणि ते हेगमधील वातावरणाशी लवकर जुळवून घेतील. (वृत्तसंस्था) आमचा संघ विजयी सलामी देईल याचा मला विश्वास आहे. भारतीय संघाचे हाय परफॉर्मन्स संचालक रोलेन्ट ओल्टमैन्स म्हणाले, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पूर्वार्ध संथ होता; परंतु उत्तरार्धात संघाने चांगला खेळ केला. डिफेन्समध्येही कामगिरी चांगली राहिली. ललित उपाध्याय आणि युवराज वाल्मिकी यांनीही पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. हा संघ वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करेल, असा मला विश्वास वाटतो. डिफेंडर आणि पेनल्टी कॉर्नर व्ही.आर. रघुनाथ यानेही चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला. तो म्हणाला, आम्हाला येथील वातावरणाचा चांगला अभ्यास झाला आहे. विश्वचषकात खेळण्यास सर्व आतुर आहेत आणि सराव सत्रात संघाने चांगली कामगिरी केली. आम्ही तणावमुक्त राहून खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गत सत्रात आपल्या डिफेन्स आणि पेनल्टी कॉर्नरवर सुधारणा करण्यासाठी खूप सराव केला आहे. चांगली कामगिरी करू, असा मला विश्वास आहे.

Web Title: India's opening match against Belgium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.