शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’

By admin | Updated: November 12, 2014 23:47 IST

पाच सामन्यांच्या मालिकेत लंकेकडून अद्याप प्रतिकाराचा सामना न करणा:या ‘टीम इंडिया’चा इरादा उद्या, गुरुवारी चौथा वन डे जिंकून ‘क्लीन स्वीप’ करण्याचा असेल.

वन डे मालिका : श्रीलंकेविरुद्ध चौथा सामना आज 
कोलकाता : पाच सामन्यांच्या मालिकेत लंकेकडून अद्याप प्रतिकाराचा सामना न करणा:या ‘टीम इंडिया’चा इरादा उद्या, गुरुवारी चौथा वन डे जिंकून ‘क्लीन स्वीप’ करण्याचा असेल.
लंकेने गोलंदाजीला धार आणण्यासाठी संघात अजंता मेंडिस याचा समावेश केला आहे. इतकेच नव्हे, तर फलंदाजी सुधारण्यासाठी उर्वरित दोन सामन्यांत लाहिरू तिरिमाने आणि दिनेश चांदीमल यांनाही संधी दिली. या खेळाडूंना संघात स्थान देण्यात पाहुण्यांनी उशीर केला, कारण भारताने मालिका 3-क् ने आधीच खिशात घातली. लंकेला आता दोन्ही सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. 
भारताने नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या अनुपस्थितीत काही नव्या चेह:यांना संधी दिली. शिखर धवन आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी रोहित शर्मा आणि रॉबिन उथप्पा यांना संधी दिली. धवनसोबत डावाची सुरुवात रोहित की अजिंक्य रहाणो यापैकी कोण करेल, हा उत्सुकतेचा विषय असेल. रोहितने जखमेतून सावरल्यानंतर संघात स्थान मिळविले. भारत ‘अ’ कडून सराव सामन्यात त्याने 142 धावांची खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा चमकदार खेळ करीत निवडकत्र्याचे लक्ष वेधण्याचे रोहितचे प्रयत्न राहतील. 
धवनने मागच्या सामन्यात विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने या मालिकेत 283 धावा केल्या. निवडकत्र्यानी त्याला दोन सामन्यांसाठी विश्रंती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितशिवाय फलंदाज आणि पार्टटाईम विकेटकिपर रॉबिन उथप्पा याने संघात स्थान मिळविल्याने फलंदाजी क्रमात कसा बदल होतो, हे पाहावे लागेल. 
लंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने आपल्या फलंदाजांना धावा न काढल्याबद्दल चांगलेच धारेवर धरले आहे. कुमार संगकारा, उपुल थरंगा, धम्मिका प्रसाद आणि सूरज रणदिव यांना त्याने बाहेरचा रस्ता दाखवत नवे डावपेच आखले आहेत. मेंडिसच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी भक्कम होणार आहे. भारतीय फलंदाजांनी आतार्पयतच्या सामन्यात लंकेच्या गोलंदाजांची बेमुर्वत पिटाई केली. पण, मेंडिसच्या सोबतीला असलेले तिरिमाने आणि चांदीमल हे किती आवर घालतात हे पाहावे लागेल. जयवर्धने उत्तम फॉर्ममध्ये असून, त्याने मागच्या सामन्यात 124 चेंडूंवर 118 धावा ठोकल्या होत्या. 
भारताच्या गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीत उमेश यादव हा अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकला. त्याने तीन सामन्यांत आठ गडी 
बाद केले. डावखुरा अक्षर 
पटेल यानेदेखील आशा पल्लवित केल्या. कर्ण शर्मा, विनय कुमार आणि केदार जाधव यांच्याकडूनही ब:याच आशा आहेत. कर्ण आणि विनय कुमार यांना उद्या संधी मिळू शकते. कर्ण शर्मा याने लेगस्पिनचा करिश्मा दाखवित सलगपणो बळी घेतले आहेत.  ईडनच्या खेळपट्टीवर भारत तीन फिरकी गोलंदाजांना संधी देईल, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था) 
 
4भारत : विराट कोहली कर्णधार, अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, विनयकुमार, स्टुअर्ट बिन्नी, 
कर्ण शर्मा, अक्षर पटेल आणि केदार जाधव.
 
4श्रीलंका : अॅन्जेलो मॅथ्यूज कर्णधार, कुशल परेरा, तिलकर}े दिलशान, लाहिरु तिरिमाने, माहेला जयवर्धने, दिनेश चांदीमल, अशान प्रियांजन, निरोशन डिकलोवा, तिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, लाहिरु गमागे, चतुरंगा डिसिल्व्हा, सकुगे प्रसन्ना, अजंता मेंडिस आणि शमिंडा इरांगा.
 
दोन सामन्यांतही कसर राखणार 
नाही : कोहली
लंकेविरुद्ध अन्य दोन सामन्यांतही कसर राखणार नाही, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने स्पष्ट केले.‘ विश्वचषक पुढे असताना आम्हाला विजयाची सवय लावावी लागेल. आम्ही विजयी लय कायम राखू इच्छितो. लंकेविरुद्ध कुठलीही शिथिलता न बाळगता विजय मिळविणो हे मुख्य उद्दिष्ट असेल,’ असे कोहलीने सांगितले.