शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य

By admin | Updated: March 6, 2015 16:57 IST

भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर वेस्ट इंडिजचा डाव १८२ धावांवर आटोपला असून भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी भारतीय संघाचे कौतुक

ऑनलाइन लोकमत
 
पर्थ, दि. ९ - भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर वेस्ट इंडिजचा डाव १८२ धावांवर आटोपला असून भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी भारतीय संघाचे कौतुक केले असले तरी या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी तब्बल ४ झेल सोडले. या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे विंडीजला १८१ धावांचा सन्मानजनक आकडा गाठता आला.
 
वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हे संघ आमने सामने होते. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-याने विंडीजची अक्षरशः वाताहत झाली. यंदाच्या विश्वचषकात द्विशतक ठोकणारा ख्रिस गेल (२१ धावा) याच्यासह विंडीजचे आघाडीचे सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. वेस्ट इंडिजची अवस्था ७ बाद ८५ धावा अशी होती. यानंतर डॅरेन सॅमी (२६ धावा ) आणि कर्णधार जेसन होल्डरने विंडीजला १२५ चा पल्ला गाठून दिला. सॅमी बाद झाल्यावर  होल्डरने जेरोम टेलरच्या (११ धावा) साथीने विंडीजला १५० टप्पा गाठून दिला. होल्डरने ५७ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. 
भारतातर्फे मोहम्मद शमीने ३ विकेट, उमेश यादव व रविंद्र जडेजाने प्रत्येकी दोन तर आर. अश्विन व मोहित शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.