नेमबाजी : इलावेनिलने जिंकले विश्वचषक सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 23:53 IST2019-08-29T23:52:37+5:302019-08-29T23:53:56+5:30
महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात जोरदार मुसंडी

नेमबाजी : इलावेनिलने जिंकले विश्वचषक सुवर्ण
रिओ : भारताची २९ वर्षांची नेमबाज इलावेनिल वलारिवानने दहा मीटर एअर रायफल प्रकारात अनेक दिग्गजांना मागे टाकून गुरुवारी वरिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पहिले सुवर्ण जिंकले. ही कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय नेमबाज ठरली. अंजली भागवत व अपूर्वी चंदेला यांनी याआधी अशी कामगिरी केली आहे.
तिची ही कामगिरी मात्र आॅलिम्पिक कोटा मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही. अंजुम मुदगिल व अपूर्वी चंदेला यांनी मात्र गतवर्षी विश्वचषकात आॅलिम्पिकची पात्रता गाठली होती. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली अपूर्वी व दुसऱ्या स्थानावरील अंजुम यांना मात्र पदक जिंकण्यात अपयश आले.
अंजुम १६६.८ गुणांसह सहाव्या स्थानावर घसरली. अपूर्वीला पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही. ती ११ व्या स्थानी राहिली. सिनियर गटाच्या पदार्पणातील स्पर्धेत इलावेनिलने फायनलमध्ये २५१.७ गुण मिळविले. ब्रिटनची सियोनाद मॅकिन्टोश २५०.६ गुणांसह दुसºया व चिनी तैपईची यिन शिन लिनने कांस्य जिंकताना टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली. दुसरा कोटा इराणला मिळाला. इलावेनिलने आशियाई चॅम्पियनशिपसह ज्युनियर विश्वचषकातही सुवर्ण जिंकले आहे.