शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

बॅडमिंटन, हॉकी, अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतीयांची चमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 07:35 IST

आशियाई स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. तिने यामागुचीला नमवून अंतिम फेरीत धडक मारली. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून यामागुची दुसºया स्थानी आहे

आशियाई स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. तिने यामागुचीला नमवून अंतिम फेरीत धडक मारली. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून यामागुची दुसºया स्थानी आहे. हा सामना खूपच अटीतटीचा झाला. सिंधूने दुसरा गेम गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले. आता अंतिम सामन्यात सिंधू जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चिनी तैपईच्या ताईविरुद्ध भिडेल. ताई हिने उपांत्य सामन्यात सायना नेहवालला नमवून आगेकूच केली. अंतिम फेरीतील खेळाडूंच्या क्रमवारीत नक्कीच अंतर असेल, पण माझ्यामते हे अंतर माफक आहे. सायना आणि सिंधू यांच्या खेळातील फरक सांगायचा झाल्यास, सर्वात महत्त्वाचे वय लक्षात घ्यावे लागेल. सायना सिंधूच्या तुलनेत ५-६ वर्षांनी मोठी आहे. तसेच २०१३ पासून सायनाने ताईला नमवलेले नाही. त्यामुळे एक मानसिक दबावही तिच्यावर आले असेल. तरी सामना सुरु झाला तेव्हा सायना जिंकू शकते असे वाटत होते. कारण या स्पर्धेत सायनाने आपले सर्व सामने सरळ दोन गेममध्ये जिंकलेले आहेत आणि त्यामुळे ती चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती. पण ताईने जबरदस्त खेळ केला. मला वाटतं की दुसºया गेममध्ये सायना थोडी हळूवार झाल्याचे दिसले.

हॉकीमध्ये भारताच्या दोन्ही संघांकडून पदकांची अपेक्षा आहे. ज्याप्रकारे भारताचा महिला संघ खेळत आहे आणि ज्याप्रकारे त्यांनी द. कोरियाला नमवले, ते पाहता संघ अत्यंत मजबूत असल्याचे दिसून आले. दोन्ही संघांसाठी सुवर्ण पदक नक्कीच अवाक्यात आहे, पण त्यांनी गाफील राहता कामा नये. नाहीतर त्याचा मोठा फटका बसेल. दुसरीकडे झुंजार दुती चंदने सर्वांचे लक्ष वेधले. ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर आली आहे. तिच्या जिद्दिला मी सलाम करतो. याशिवाय हिमा दास, मोहम्मद अनस यांनीही रौप्य कमाई केली. या तिघांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये चमकदार कामगिरी केली.क्रिकेटसाठी सोमवारचा दिवस खास ठरला. दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या ११०व्या जयंतीनिमित्त संपूर्ण क्रिकेटविश्वाने त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या फलंदाजीची सरासरी ९९.९४ इतकी जबरदस्त होती. कोणताही फलंदाज इतकी सरासरी गाठण्याची कल्पनाही करु शकत नाही. १९९१-९२च्या दरम्यान भारताच्या आॅस्टेÑलिया दौºयादरम्यान माझी त्यांच्याशी भेट झाली होती, पण संवाद झाला नव्हता. अ‍ॅडलेड स्टेडियमवर तेव्हा ते खास सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहण्यास आले होते. जेव्हा आम्हाला कळाले की ब्रॅडमन आलेत, तेव्हा आम्ही सामना सोडून त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी आमच्या आॅस्टेÑलियातील पत्रकार बंधूंनी भारतीय पत्रकारांची ब्रॅडमन यांच्यासह ओळख करुन दिली होती.अयाझ मेमनसंपादकीय सल्लागार

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाHockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ