"आपल्याला एक राष्ट्र आणि समाज म्हणून...", Sania Mirza ची 'मन की बात'!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 06:49 PM2024-04-05T18:49:25+5:302024-04-05T18:54:59+5:30

Sania Mirza On WPL: सानिया मिर्झा मागील काही कालावधीपासून तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे.

 Indian tennis star Sania Mirza has commented on the issue of women empowerment  | "आपल्याला एक राष्ट्र आणि समाज म्हणून...", Sania Mirza ची 'मन की बात'!

"आपल्याला एक राष्ट्र आणि समाज म्हणून...", Sania Mirza ची 'मन की बात'!

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा मागील काही कालावधीपासून तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक आणि सानिया हे दोघे विभक्त झाले आहेत. शोएबने पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. तो तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला. तेव्हापासून सानियाने एकदाही जाहीरपणे भाष्य केले नाही. पण, आता सानियाने महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करत विविध बाबींवर प्रकाश टाकला आहे. (Sania Mirza News) 

सानियाने सांगितले की, आपल्याला एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून अधिकाधिक मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. आपण जास्तीत जास्त मुलींना त्यांना जे आवडते ते सर्व करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. मला वाटते की हे हळूहळू होत आहे. परंतु सर्वच बाबींमध्ये सुधारणेसाठी नेहमीच जागा असते. मी टेनिसमधून निवृत्ती घेण्यामागे एक कारण माझ्या मुलासोबत वेळ घालवणे हे होते, जे मी आता करते आणि मला हे करायला आवडते. मी अजूनही काम करते, माझी हैदराबादमध्ये एक टेनिस अकादमी आहे, दुबईमध्ये देखील काही आहेत. मी स्वतःला मुद्दाम व्यग्र ठेवते पण जास्तही व्यग्रही राहत नाही कारण मला माझ्या मुलासोबत थोडा वेळ घालवायचा असतो. सानिया ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होती. 

तसेच महिला प्रीमिअर लीग ही महिला क्रिकेटसाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण महिला क्रिकेट हे आधीपासूनच खेळले जात आहे. असे नाही की ते खेळले जात नव्हते. पण, दुर्दैवाने पुरूष क्रिकेटपटूंना जी ओळख मिळाली ती त्यांना मिळाली नाही. आता महिला प्रीमिअर लीगमुळे खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याचे एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. या माध्यमातून महिला खेळाडू आपली प्रतिभा दाखवू शकतात. अशाने खेळ मोठा होण्यास मदत होईल, असेही सानिया मिर्झाने म्हटले. 

Web Title:  Indian tennis star Sania Mirza has commented on the issue of women empowerment 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.