शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

लॉकडाऊनमध्ये पोलीस कर्तव्यात व्यस्त आहेत भारतीय खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:26 AM

आम्ही मास्क आणि सॅनिटायझर सोबत बाळगतो. तथापि लोकांनी रस्त्यावर येऊ नये, ही आमची मोठी चिंता आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभर लॉकडाऊन झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस सध्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर गर्दी करू नका, घराबाहेर येऊ नका, असे सातत्याने आवाहन करीत आहेत. क्रीडा मैदानावर देशासाठी शानदार कामगिरी करणाºया खेळाडूंनी या कार्यात स्वत:ला झोकून दिले असून पोलीस दलातील हे खेळाडू सध्या देशकर्तव्य बजावत आहेत.

विश्वचषक विजेता क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा, भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार राजपालसिंग, राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता माजी बॉक्सर अखिलकुमार आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन कबड्डीपटू अजय ठाकूर आदी सर्वजण पूर्णवेळ पोलीस अधिकारी आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उपलब्धीमुळे त्यांना ही नोकरी मिळाली.

मोहालीत डीएसपी पदावर कार्यरत राजपाल म्हणाला,‘मी पोलीसमध्ये पूर्णवेळ कार्यरत आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे यासाठी झटत आहे. गरजूंना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. अशावेळी संयम पाळण्याची गरज आहे शिवाय पोलिसांचा मानवी चेहरा पुढे यायला हवा. लोकांमधील भीती नाहीशी व्हावी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत.’

टी२० विश्वचषक २००७ च्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात विजय मिळवून देणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा म्हणाला, ‘२००७ पासून हरियाणा पोलीस दलात मी डीएसपी आहे. सध्या वेगळ्या प्रकारच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. सकाळी ६ वाजेपासून लोकांना सावध करणे, कर्फ्यूचे पालन करायला लावणे आणि त्यांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करतो.

’गुरुग्राम पोलीस दलात एसीपी राष्टÑकुल २००६ चा सुवर्ण विजेता अखिल कुमार म्हणाला, ‘लोकांचे सहकार्य मिळत आहे. अत्यावश्यक वस्तू सहज मिळत असल्याने अफवांवर आळा बसला. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केल्यानेच कोरोनाचे भय नष्ट होईल, हे लोकांनादेखील पटले आहे.’

३८ वा वाढदिवस साजरा करणाºया अखिलने मित्रांसोबत निधी गोळा करून त्यातून गरिबांना खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि सॅनिटायझर उपलब्ध करून दिले.रेवाडी येथे कार्यरत आशियाई स्पर्धेचा कांस्य विजेता जितेंदर म्हणाला,‘ आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. भूक काय असते याची जाणीव असल्यामुळे पोलीस असलो तरी मानवी भावनेतून कामात व्यस्त आहोत. सेवा, सुरक्षा आणि सहकार्य ही पोलीस खात्याची त्रिसूत्री आहे. त्यावर अंमल करण्याची हीच वेळ आहे.’अर्जुन पुरस्कार तसेच पद्मश्री विजेता कबड्डीपटू ठाकूर हा हिमाचल प्रदेश पोलीस दलात कार्यरत असून बिलासपूरमध्ये तैनात आहे.तो म्हणाला, ‘आम्ही मास्क आणि सॅनिटायझर सोबत बाळगतो. तथापि लोकांनी रस्त्यावर येऊ नये, ही आमची मोठी चिंता आहे. खेळाडू या नात्याने संयम काय असतो, हे इतरांंना पाटवून सांगतो. सद्यस्थितीवर मात करण्यासाठी संयम हाच मोठा उपाय ठरणार आहे.’ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस