भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ जाहीर
By Admin | Updated: November 1, 2014 21:48 IST2014-11-01T21:48:18+5:302014-11-01T21:48:18+5:30

भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ जाहीर
>नवी दिल्ली: हॉकी इंडिया (एचआय) ने न्यूझीलंडविरुद्ध 3 ते 15 नोव्हेंबरदरम्यान होणार्या कसोटी मालिकेसाठी राष्ट्रीय कनिष्ठ महिला हॉकी संघ जाहीर केला आह़े हॉकी इंडियाचे महासचिव मुश्ताक अहमद म्हणाले, पुढीलवर्षी होणार्या कनिष्ठ महिला आशियाई कपचे महत्त्व लक्षात घेऊनच न्यूझीलंडला जाणार्या महिला संघाची निवड केली गेली़ यामुळे खेळाडूंना देशाबाहेर वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा अनुभव मिळणार आह़े आशिया कप ही खूप मोठी स्पर्धा आह़े येथील विजयामुळे संघ 2016 मध्ये होणार्या ज्युनिअर महिला विश्वकपसाठी क्वालीफाय करणार आह़े या 18 सदस्यीय संघात डिफेंडर दीप ग्रेस एक्का कर्णधार तर फॉरवर्ड नवज्योत कौर उपकर्णधारपदाची भूमिका निभावणार आहेत़