बॉक्सिंगमधील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाचे निधन; राहुल गांधी यांना दिलेलं प्रशिक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 12:32 PM2021-05-21T12:32:23+5:302021-05-21T12:32:53+5:30

भारतीय बॉक्सिंग विश्वाला शुक्रवारी मोठा धक्का बसला. या खेळातील पहिले द्रोणाचार्य पुरस्कारविजेते प्रशिक्षक ओपी भारद्वाज यांचे ( OP Bharadwaj Dies) यांचे आजारपणामुळे निधन झाले.

Indian boxing's first Dronacharya awardee coach O P Bhardwaj dies | बॉक्सिंगमधील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाचे निधन; राहुल गांधी यांना दिलेलं प्रशिक्षण!

बॉक्सिंगमधील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाचे निधन; राहुल गांधी यांना दिलेलं प्रशिक्षण!

Next

भारतीय बॉक्सिंग विश्वाला शुक्रवारी मोठा धक्का बसला. या खेळातील पहिले द्रोणाचार्य पुरस्कारविजेते प्रशिक्षक ओपी भारद्वाज यांचे ( OP Bharadwaj Dies) यांचे आजारपणामुळे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. 2008मध्ये त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन महिने बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले होते. 10 दिवसांपूर्वी भारद्वाज यांच्या पत्नीचेही निधन झाले होते.  भारद्वाज यांचे मीत्र व माजी बॉक्सर टी एल गुप्ता यांनी पीटीआयला ही माहिती दिली. अऩेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होती. पत्नीच्या निधनाचा त्यांना मोठा धक्का बसला होता.  

भारद्वाज यांना 1985मध्ये बालचंद्र भास्कर भागवत ( कुस्ती) आणि ओएम नांबियार ( अॅथलेटिक्स) यांच्यासोबत द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. याचवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात झाली होती. भारद्वाज यांनी 1968 ते 1989 या कालावधीत भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होते. ते निवड समितीचे सदस्यही होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंनी आशियाई, राष्ट्रकुल आणि दक्षिण आशियाई स्पर्धेत पदकं पटकावली होती. भारद्वाज हे पाटियालाच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे पहिले चीफ इंस्ट्रक्टर होते. बॉक्सिंगचे माजी राष्ट्रीय प्रशिक्षक जीएस संधू यांनीही ओपी भारद्वाज यांना श्रंद्धाजली वाहिली आहे.  
 

Web Title: Indian boxing's first Dronacharya awardee coach O P Bhardwaj dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.