ज्वाला गुट्टा 'या' अभिनेत्याबरोबर करतेय डेटिंग; किस करतानाचा फोटो झाला वायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:32 IST2020-01-02T20:27:19+5:302020-01-02T20:32:42+5:30
ज्वालाचे यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनबरोबर अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती.

ज्वाला गुट्टा 'या' अभिनेत्याबरोबर करतेय डेटिंग; किस करतानाचा फोटो झाला वायरल
मुंबई : भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा ही आपल्या ग्लॅमरस अदांमुळे चांगलीच चर्चेत असते. आता तर ज्वालाने सध्या एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ज्वाला एका अभिनेत्याला किस करत असल्याचे दिसत आहे. सध्याच्या घडीला हा फोटो चांगलाच वायरल झाला आहे.
My baby ❤️❤️ happy new year ❤️❤️ @TheVishnuVishalpic.twitter.com/gxSRyVOHVb
— Gutta Jwala (@Guttajwala) December 31, 2019
Happy 2020❤️ pic.twitter.com/1HhAZ57Cl0
— Gutta Jwala (@Guttajwala) December 31, 2019
ज्वाला आपल्या मादक अदांनी चर्चेचा विषय ठरत होती. ज्वालाचे यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनबरोबर अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. अझरचे लग्न झाले होते आणि त्याला दोन मुलंही आहेत. पण तरीही अझरचे यापूर्वी अभिनेत्री संगीता बिजलानीबरोबरचे अफेअर चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता ज्वालाचे या एका अभिनेत्याबरोबर अफेअर सुरु आहे.
Happy new year from us. ❤️❤️@TheVishnuVishalpic.twitter.com/o8hZiJ6zE9
— Gutta Jwala (@Guttajwala) December 31, 2019
ज्वालाचा जन्म भारतातील वर्धा येथे ७ सप्टेंबर१९८३ साली झाला होता. त्यानंतर ज्वालाने आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. ज्वालाचे भारताचा बॅडमिंटनपटू चेन आनंदबरोबर २००५ साली लग्न झाले होते. पण या दोघांचे लग्न जास्त काळ टिकले नाही. कारण सहा वर्षांनी म्हणजेच २०११ साली ज्वाला आणि चेतन यांचा घटस्फोट झाला होता.
ज्वालाचे सध्या अभिनेता विष्णू विशालबरोबर अफेअर सुरु आहे. विष्णूचाही घटस्फोट झालेला आहे. त्याने २०११ साली रजनी नटराजनबरोबर लग्न केले होते. पण या दोघांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला होता.