भारताने सातव्यांदा सॅफ चषक पटकावला
By Admin | Updated: January 3, 2016 21:56 IST2016-01-03T21:30:05+5:302016-01-03T21:56:44+5:30
सॅफ चषक फुटबॉलमध्ये आज भारताने बलाढ्य अफगाणिस्तानवर २-१च्या फरकाने मात करत सातव्या वेळा चषकावर आपले नाव कोरले.

भारताने सातव्यांदा सॅफ चषक पटकावला
>ऑमलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. ३ - सॅफ चषक फुटबॉलमध्ये आज भारताने बलाढ्य अफगाणिस्तानवर २-१च्या फरकाने मात करत सातव्या वेळा चषकावर आपले नाव कोरले. सुनील छेत्री आणि जेजे लालपेख्लुआ यांच्या दमदार खेळीने भारताने अफगाणिस्तानवर मात केली.
भारताने उपांत्य सामन्याच्या फेरीत मालदीवचा ३-२ असा धुव्वा उडवताना आशियाई फुटबॉल चॅम्पियनशीपमध्ये विक्रमी दहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती.
आशियाई फुटबॉल संघटना (सॅफ) स्पर्धेत स्टीफन कॉन्स्टेन्टाइन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत असलेल्या भारताच्या यंग ब्रिगेडने अफगाण संघाला आज धक्का देत २०११ची पुनरावृती केली. २०११ साली या स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना भारताने अफगाणिस्तानला ४-० असे लोळवले होते.
गतस्पर्धेच्या भारतीय संघातील छेत्री, जेजे लालपेखलुआ, अर्नब मंडल, सुब्रत पाल आणि रॉबिन सिंग हे पाच खेळाडू यंदाच्या स्पर्धेत खेळत होते तर, तर उर्वरित संपूर्ण भारतीय संघ हा नवखा आहे. विशेष म्हणजे हुकमी रॉबिन सिंग हा दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतरही भारताने चमकदार कामगिरी केली. कर्णधार छेत्रीच्या शानदार नेतृत्वाला अनुभवी खेळाडूंची योग्य साथ लाभत आहे.