Hockey Asia Cup 2022: चक दे इंडिया! हॉकी आशिया चषकात भारताने इंडोनेशियाला १६-० ने धूळ चारली, पाकचं वर्ल्डकपचं तिकीट कापलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 09:30 PM2022-05-26T21:30:47+5:302022-05-26T21:32:12+5:30

जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं आज जबरदस्त कामगिरी करत इंडोनेशियाला १६-० अशी धूळ चारली आहे.

india vs indonesia hockey asia cup 2022 result pakistan world cup | Hockey Asia Cup 2022: चक दे इंडिया! हॉकी आशिया चषकात भारताने इंडोनेशियाला १६-० ने धूळ चारली, पाकचं वर्ल्डकपचं तिकीट कापलं

Hockey Asia Cup 2022: चक दे इंडिया! हॉकी आशिया चषकात भारताने इंडोनेशियाला १६-० ने धूळ चारली, पाकचं वर्ल्डकपचं तिकीट कापलं

Next

नवी दिल्ली-

जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं आज जबरदस्त कामगिरी करत इंडोनेशियाला १६-० अशी धूळ चारली आहे. या विजयासह भारतीय संघानं 'सुपर-४' मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. महत्वाची बाब म्हणजे भारताच्या दमदार विजयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे आणि पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप-२०२३ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. 

आशिया चषकाच्या नॉकआऊट स्टेजमध्ये जागा मिळवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना मोठ्या फरकानं जिकणं गरजेचं होतं. भारतीय संघानं इंडोनेशियाला थेट १६-० ने मात देत नॉकआऊट स्टेजमध्ये धडाक्यात एन्ट्री केली आहे. सामन्यात भारतीय संघानं सुरुवातीपासूनच दबदबा निर्माण केला होता. 

पहिल्या हाफमध्ये भारत ३-० ने आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये ६-० अशी मजल मारली. सामना संपला त्यावेळी भारतानं १६-० अशी इंडोनेशियाची दयनीय अवस्था केली आणि शानदार विजयाची नोंद केली. 

आजच्या सामन्याचा परिणाम थेट २०२३ मध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेवरही झाला आहे. कारण मोठ्या फरकानं जिंकणारा संघ वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरणार होता. आता भारतानं मोठ्या फरकानं विजयाची नोंद केल्यामुळे भारत वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र झाला आहे. पण पाकिस्तान संघ बाहेर फेकला गेला आहे. भारतीय संघा व्यतिरिक्त जपान, कोरिया आणि मलेशिया देखील वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत. तर पाकिस्तानचा पत्ता कट झाला आहे. आशिया चषकाचं बोलायचं झालं तर जपान आणि भारत नॉकआऊट स्टेजसाठी पात्र ठरले आहेत. 

Web Title: india vs indonesia hockey asia cup 2022 result pakistan world cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.