शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

चक्काचूर! भारताने जपानचा ३५-१ ने उडवला धुव्वा; हॉकी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 08:31 IST

कर्णधार मनिंदर सिंगने केले सर्वाधिक १० गोल

India vs Japan 35 - 1, Hockey: मनिंदर सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई हॉकी 5s विश्वचषक पात्रता स्पर्धेतील (Men Asian Hockey 5s World Cup Qualifier) त्यांच्या अंतिम साखळी सामन्यात नेत्रदीपक कामगिरी केली आणि जपानचा 35-1 ने धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघासमोर जपान असहाय्य दिसत होता. त्यांनी पहिल्या पाच मिनिटांत सात गोल केले होते आणि त्यानंतरही त्यांनी जपानच्या संघावर दया-माया दाखवली नाही. भारताकडून मनिंदर सिंगने 10 गोल केले. त्याच्याशिवाय मोहम्मद राहिलने सात, पवन राजभर आणि गुरज्योत सिंगने प्रत्येकी पाच, सुखविंदरने चार, कर्णधार मनदीप मोरने तीन आणि जुगराज सिंगने एक गोल केला. जपानसाठी मसाटाका कोबोरीने एकमेव गोल केला.

याआधी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा ७-५ असा पराभव केला होता. या सामन्यात भारताची बाजू गुरजोतने पाच तर मनिंदर आणि राहिलने प्रत्येकी एक गोल केला. मलेशियाकडून आरिफ इशाक, कर्णधार इस्माईल अबू, मोहम्मद दिन, कमरूलजामा कमरुद्दीन आणि सियारमान मॅट यांनी गोल केले. दिवसाच्या या दोन मोठ्या विजयांसह, भारत 12 गुणांसह एलिट पूल टेबलमध्ये पाकिस्तानच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिला, अशा प्रकारे थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. भारत शनिवारी या स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.

पाकिस्तानकडून भारताचा पराभव

साखळी फेरीत भारताचा एकमेव पराभव पाकिस्तानकडून झाला. टीम इंडियाला 4-5 ने पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी झालेल्या या सामन्यात भारताकडून मनिंदर सिंग (१७वा, २९वा), गुरजोत सिंग (१२वा) आणि मोहम्मद राहिल (२१वा) यांनी गोल केले. पाकिस्तानकडून एहतेशम अस्लम (दुसरा, तिसरा), झिकारिया हयात (5वा), अब्दुल रहमान (13वा) आणि अब्दुल राणा (26वा) यांनी गोल केले. यापूर्वी टीम इंडियाने ओमानवर 12-2 असा दणदणीत विजय नोंदवला होता.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतJapanजपानPakistanपाकिस्तान