India at Commonwealth Games 2018: असा आहे स्पर्धेचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 20:36 IST2018-04-02T20:36:08+5:302018-04-02T20:36:08+5:30
गोल्ड कोस्ट येथे 4 ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा इतिहास काय सांगतो, ते जाणून घ्या.

India at Commonwealth Games 2018: असा आहे स्पर्धेचा इतिहास
राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात झाली ती 1930 साली. त्यावेळी या स्पर्धेचे नाव Empire Games असे ठेवण्यात आले होते. 1950 पर्यंत या स्पर्धेचे हेच नाव होते. पहिल्या स्पर्धेत 11 देशांच्या 400 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रकुल स्पर्धा प्रत्येक चार वर्षांमध्ये खेळवली जाते. पण 1942 आणि 1946 या वर्षांमध्ये स्पर्धा खेळवली गेली नव्हती, कारण या काळात दुसरे महायुद्ध सुरु होते.
राष्ट्रकुल स्पर्धा 1998 साली पहिल्यांदा आशियाई देशांमध्ये खेळवली गेली. 1998 साली ही स्पर्धा क्वालालंपूर येथे खेळवली गेली.
भारतामध्ये 2010साली दिल्लीमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताने दुसरा क्रमांक पटकावला होता.
2022 साली होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिकेने आपला दावा केला होता. राष्ट्रकुल महासंघाची ऑकलंडला बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी ही मागणी मान्य केली होती. पण दक्षिण आफ्रिकेला महासंघाच्या निकषांची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे आता 2022 साली ही स्पर्धा बर्मिंगहॅमला होणार आहे.