शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

जबरदस्त! पाकिस्तानला नमवून भारताने सलग तिसऱ्यांदा दिमाखात जिंकला हॉकी Asia Cup!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 00:01 IST

IND vs PAK Hockey Final, Asia Cup 2024: भारताच्या अरायजितसिंग हुंदलने एकट्याने तब्बल ४ गोल केले, भारताने पाकिस्तानला ५-३ ने केलं पराभूत

IND vs PAK Hockey Final, Junior Asia Cup 2024: भारतीय ज्युनियर हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यावेळी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ५-३ असा पराभव केला. या विजयात अरायजितसिंग हुंदलची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याने स्फोटक खेळ करत ४ गोल केले. त्याच्या मदतीने गतविजेत्या भारताने बुधवारी झालेल्या पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात विजय मिळवला.

भारताने एकूण पाचव्यांदा विजेतेपद पटकावले

आशियाई स्पर्धेतील भारताचे हे पाचवे विजेतेपद आहे. यापूर्वी भारताने 2004, 2008, 2015 आणि 2023 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. कोविडमुळे 2021 मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. सामन्यात हुंदलने चौथ्या, १८व्या आणि ५४व्या मिनिटाला तीन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले आणि ४७व्या मिनिटाला मैदानी गोल केला. भारतासाठी दुसरा गोल दिलराज सिंगने (१९व्या मिनिटाला) केला. तर पाकिस्तानकडून सुफियान खानने (३०व्या आणि ३९व्या मिनिटाला) दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, आणि हन्नान शाहिदने तिसऱ्या मिनिटाला मैदानी गोल केला.

असा रंगला सामना

पाकिस्तानने सामन्याची सुरुवात चांगली केली होती. तिसऱ्याच मिनिटाला शाहिदच्या मैदानी गोलने आघाडी घेतली. काही सेकंदांनंतर भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला, हुंदलने पाकिस्तानच्या गोलकीपरच्या उजव्या बाजूने केलेल्या शक्तिशाली ड्रॅग फ्लिकसह गोल केला नि सामना बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आपला खेळ सुधारला आणि त्याला १८व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला जो हुंदलने गोलमध्ये रुपांतरित केला. एका मिनिटानंतर दिलराजने केलेल्या उत्कृष्ट मैदानी गोलने भारताची आघाडी ३-१ अशी वाढली. ३०व्या मिनिटाला एक आणि ३९ व्या मिनिटाला दुसरा असे सुफियानच्या पेनल्टी कॉर्नरच्या गोलमुळे पाकिस्तानने सामना पुन्हा बरोबरीत आणला.

भारताने ४७व्या मिनिटाला तिसरा पेनल्टी कॉर्नर जिंकला पण हुंदलचा तो फटका पाकिस्तानचा गोलरक्षक मुहम्मद जंजुआने वाचवला. तरीही हुंदलने काही सेकंदांनी मैदानी गोल करत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. भारताने शेवटच्या १० मिनिटांत पाकिस्तानवर जोरदार दबाव आणला आणि आणखी काही पेनल्टी कॉर्नर जिंकले. त्यात हुंदलने पुन्हा एकदा शानदार व्हेरिएशन गोल करून संघाला ५-३ असा विजय मिळवून दिला.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndiaभारतHockeyहॉकीasia cupएशिया कप 2023Pakistanपाकिस्तान