शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
3
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
4
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
5
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
6
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
7
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
8
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
9
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
10
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
12
'X'वर अश्लील कंटेंट विरोधात अ‍ॅक्शन, ६०० अकाउंट डिलीट; मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर, इलॉन मस्क यांची कारवाई
13
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
14
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
15
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
16
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
17
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
18
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
19
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
Daily Top 2Weekly Top 5

यहॉं के हम सिकंदर! कोल्हापूरच्या पूजाला रौप्य पदक; महाराष्ट्राला रोड रेस मध्ये चॅम्पियनशिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:09 IST

रोड रेस मध्ये महाराष्ट्राच्या संघाने १ सुवर्ण आणि २ रौप्य पदके जिंकून चॅम्पियनशिप मिळवली आहे. 

जबलपूर : कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजा दानोळेने आपले वर्चस्व आबाधित ठेवत पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये पदकाचा षटकार नोंदवला. तिने गुरुवारी जबलपूर येथे आयोजित रोडच्या ६० किमी अंतराच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी धडक मारली. पूजाने ही रेस २ तास १३ मिनिट ४८.९४१ सेकंदात हे अंतर पूर्ण केले. त्यामुळे तिला या इव्हेंटमध्ये रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. तिने  गोल्डन हॅट्रिकसह दोन रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली. पूजाच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला सायकल रोड रेस मध्ये चॅम्पियनशिप देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र महिला संघाने रोड रेस सायकलिंग स्पर्धेचा समारोप रौप्य पदक  जिंकून साजरा केला. या स्पर्धेत महाराष्ट्राला एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा बहुमान मिळवता आला

महाराष्ट्र संघाचे डझनभर पदकेआंतरराष्ट्रीय पूजाच्या नेतृत्वात महाराष्ट्र सायकलींग संघाने यंदाच्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये डझनभर पदकांची कमाई केली. यामध्ये एकट्या पूजाने अर्ध्या डझन पदकांचे योगदान दिले. महाराष्ट्र संघाने सायकलिंग स्पर्धेत ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्य पदकाची कमाई केली आहे.

मेहनतीमुळे मिळाला मोठा बहुमान - प्रशिक्षक दिपाली पाटीलराष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी प्रचंड मेहनत केली. जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर खेळाडूंनी पदकांचा पल्ला गाठला. त्यामुळे निश्चितपणे त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. चॅम्पियनशिप चा बहुमान मिळवून या खेळाडूने महाराष्ट्राच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी केली आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दिपाली निकम यांनी खेळाडूंचे खास कौतुक केले.

महाराष्ट्राचे घवघवीत यश - चंद्रकांत कांबळेदिल्ली मधील आंतरराष्ट्रीय सायकलिंग ट्रॅक आणि मध्य प्रदेशातील रोड रेस गाजवत महाराष्ट्राच्या युवा सायकलिस्टने यंदाच्या खेलो इंडिया युथ गेम मध्ये घवघवीत सोनेरी यश संपादन केले. डझनभर पदके जिंकून महाराष्ट्र संघ चॅम्पियनशिप चा मानकरी ठरला, ही राज्यासाठी गौरवशाली बाब ठरली आहे. यादरम्यान संघातील प्रत्येक खेळाडूने प्रचंड मेहनतीच्या बळावर महाराष्ट्राला हा मोठा बहुमान मिळवून दिला. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कौतुकाचे मानकरी आहेत, अशा शब्दात महाराष्ट्र संघाचे मुख्य पथक प्रमुख सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी संघावर कौतुकाचा वर्ष केला.

चॅम्पियनशिपने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा - दिवसेमेहनत आणि प्रचंड जिद्द यातून महाराष्ट्राच्या युवा सायकलिस्टने यंदा सर्वोत्तम कामगिरी केली. सायकलिंग मधील सर्वसाधारण विजेतेपद मिळवून या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे हे सर्व पदक विजेते खेळाडू निश्चितपणे कौतुकास पात्र ठरत आहेत. याच दर्जेदार कामगिरीमुळे जागतिक स्तरावर हे खेळाडू निश्चितपणे महाराष्ट्राला मोठी ओळख मिळवून देतील, असा विश्वास क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र सायकलिंग संघाचे खास कौतुकही केले.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKhelo Indiaखेलो इंडियाkolhapurकोल्हापूर