बापरे! 'राक्षस' बघायचाय तर 'WWE'चा हा व्हिडीओ पाहा, पण तुमच्या रीस्कवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 18:33 IST2019-09-16T18:33:03+5:302019-09-16T18:33:16+5:30

जर तुम्ही काही चिटींग केलीत तर हा राक्षस तुम्हाला पकडतो, असे म्हणतात.

If you want to see the monster, watch this WWE video, but at your risk ... | बापरे! 'राक्षस' बघायचाय तर 'WWE'चा हा व्हिडीओ पाहा, पण तुमच्या रीस्कवर...

बापरे! 'राक्षस' बघायचाय तर 'WWE'चा हा व्हिडीओ पाहा, पण तुमच्या रीस्कवर...

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला 'WWE'मध्ये एक राक्षस धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. जर तुम्ही काही चिटींग केलीत तर हा राक्षस तुम्हाला पकडतो, असे म्हणतात. या खेळाडूंना पकडल्यावर तो त्यांना बेशुद्ध करतो आणि .... नेमके काय करतो, ते व्हिडीओमध्येच बघा

'WWE'मध्ये क्लॅश ऑफ चॅम्पियन्सशिप ही मॅच खेळवली गेली. ही मॅच सेथ रोलिंग्स आणि ब्रॉन स्ट्रोमॅन यांच्यामध्ये खेळवली गेली. हा सामना रोलिंग्सने जिंकला. स्ट्रोमेन हा रोलिंग्सपेक्षा जास्त बलवान वाटत होता. तोच हा सामना जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण त्याला रोलिंग्सने पराभूत करून बेल्ट जिंकला. त्यानंतर रोलिंग्स जेव्हा बेल्ट घेऊन बाहेर पडत होता, तेव्हा राक्षस आला आणि त्याने रोलिंग्सवर झडप घातली. यामध्ये रोलिंग्स बेशुद्ध झाल्याचे पाहायला मिळाले.


पाहा हा व्हिडीओ

रोलिंग्स बेल्ट घेऊन जात असताना 'द फेंड' (राक्षस) तिथे आला आणि त्याने रोलिंग्सला बेशुद्ध केले. आता रोलिंग्सबरोबर मला सामना खेळायचा आहे, असे राक्षस म्हणत आहे.

Web Title: If you want to see the monster, watch this WWE video, but at your risk ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.